जागतिक योग दिना निमित्त कल्पनेश्वर टेकडी ग्रुप तर्फे विविध उपक्रम
नूरखान
२१ जून २०२० रोजी जागतिक योग दिनानिमित्त ‘कल्पनेश्वर प्रतिष्ठान,अमळनेर’ यांच्यातर्फे ढेकु रोड टेकडीवर (कल्पनेश्वर टेकडी) विविध उपक्रम घेण्यात आले.
यावेळी पर्यावरण प्रेमींकडून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त शिक्षिका मैराळे मॅडम यांच्याकडून भिल्ल वस्तीतील मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मार्केट मधील अंबाजी मॅचिंग सेंटर यांच्यातर्फेही ५ रोपांचे वृक्षारोपण झाले. सदर सर्व उपक्रम सामाजिक अंतर ठेवून राबवण्यात आले.
कल्पनेश्वर टेकडी ग्रुप तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून ढेकू रोड वरील टेकडीवर 200 झाडांच्या रोपणाचा संकल्प आहे.या संकल्पा च्या पहिल्या टप्प्यात 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 14 जून रोजी वड,उंबर,निंब, पिंपळ,आयुर्वेदिक औषधी वनस्पती इ ची लागवड ढेकू रोडवरील टेकडीवर करण्यात आली.






