India

प्रेरणादायी.. जगभरात गाजतंय एकच नाव मीराबाई चानू..पहा कोण आहे मीरा..एक स्वप्न ते ऑलम्पिक पदक..एक प्रवास..

प्रेरणादायी.. जगभरात गाजतंय एकच नाव मीराबाई चानू..पहा कोण आहे मीरा..एक स्वप्न ते ऑलम्पिक पदक..एक प्रवास..

एकच दिवसांत मीराबाई चानू हे नाव आज संपूर्ण देशातच नव्हे तर जगात गाजत आहे..टोकियो ऑलिम्पिकच्‍या सुरुवातीलाच मीराबाई चानूने इतिहास रचला आहे. ४९ किलाे वजनी गटात तिने रौप्‍यपदक प्राप्त करत भारताचे आवाहन ऑलम्पिक मध्ये जिवंत ठेवले आहे. ऑलिम्पिक स्‍पर्धेत वेटलिप्‍टिंगमध्‍ये रौप्‍यपदक जिंकणारी चानू देशातील पहिली वेटलिफ्‍टर ठरली आहे.

भावापेक्षाही उचलायची अधिक वजन ..

मणिपूर राज्‍यातील चानूला लहानपणापासून खेळाची विशेष आवडहोती.दणकट शरीरयष्‍टी लाभलेली चानू खेळत ही असे भरपूर..पर्यायाने शरीर अधिकच मजबूत बनत गेलं..लहान गावातील असल्याने स्वयंपाकासाठी लहानपणी डोक्‍यावरुन लाकडे वाहून आणावी लागत असत इतर मुलींपेक्षा अधिक लाकडे चानू आणत असे विशेष म्हणजे आपल्‍या भावापेक्षा अधिक वजनाची लाकडे वाहून आणत असे कदाचित हीच तिच्या वेट लिफ्टिंग ची सुरुवात म्हणावी…

तिला नेमबाज व्हायचे होते. १४ वर्षांची असताना चानू ही फायरिंग रेंज आपले नाव नोंदविण्‍यासाठी गेली होती पण ते केंद्रच बंद होते.इथेच काही मुले वेटलिप्‍टिंगचा सराव करत होती. तिला हा खेळ कमालीचा आवडला. घरी जाताना तिने आपण वेटलिप्‍टिंगमध्‍येच करीयर करण्‍याचे ठरविले

२०१४ मध्‍ये तिने ४८ किलोग्रॅम वजन गटातील स्‍पर्धांमध्‍ये भाग घेतला. या स्‍पर्धेत रौप्‍य पदक पटकावले. २०१८मध्‍ये गोल्‍ड कोस्‍ट येथे झालेल्‍या जागतिक स्‍पर्धेत सुर्वण पदाकावर आपली मोहर उमटवली.

वेटलिप्‍टिंगचा जागतिक स्‍पर्धा असो की राष्‍ट्रकूल चानूची कामगिरी नेहमीच उल्‍लेखनीय राहिली. कामगिरीतील सातत्‍यामुळे केंद्र सरकारने तिचा पद्मश्री पुरस्‍कार देवून गौरव केला आहे.

२०१६ च्‍या रिओ ऑलिम्‍पिकमध्‍ये पदकाने तिला हुलकावणी दिली. आपल्‍या कामगिरीने ती फारच निराश झाली होती. यातून बाहेर पडण्‍यास काही काळ जावा लागला. स्‍वत:मधील उणीवा शोधल्‍या. त्‍या कमी करण्‍यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले. सरावावेळी झालेल्‍या दुखापतीमुळे तिला २०१८ मधील आशिया स्‍पर्धेलाही मुकावे लागले होते. मात्र यामुळे ती हताश झाली नाही. टोकियो ऑलिम्‍पिक हेच आपले लक्ष्‍य ठेवले. टोकियो स्‍पर्धेत पदक मिळवायचे यासाठी सरावात सातत्‍य ठेवले. गेली चार वर्ष तिने केलेली मेहनत अखेर सफल झाली आहे.

संपूर्ण देशवासीयांच्‍या मान उंचवावी अशी कामगिरी करत भारतीय क्रीडा क्षेत्राच्‍या इतिहासात तिने आपले नाव सुर्वणाक्षरात नोंदवले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button