Maharashtra

चांप्यात प्रभाग दोन मध्ये नवीन बोअरवेलचे गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

चांप्यात प्रभाग दोन मध्ये नवीन बोअरवेलचे गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी अनिल पवार

चांपा, ता३१:* जिल्हा परिषद व पंचायत समिती कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी चांप्याचे सरपंच अतिश पवार यांच्या पाठपराव्यामुळे आज बोअरवेल्स चे उद्घाटनप्रसंगी उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे व सोबतच सहायक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्या उपस्थतीमध्ये चांपा गावातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये आदिवासी स्मारक येथे नवीन बोर करण्यात आला.

प्रभाग क्रमांक दोन मध्ये नवीन बोर ला पाणी लागल्याने येथिल पिण्याचा पाण्याची समस्या सोडवली. व सोबतच चांपा येथिल सार्वजनिक जुन्या विंधन विहिरींची दुरुस्ती करण्याचा निर्णय पंचायत समिती व ग्रामंचायतीने घेतला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button