दिंडोरी महाविद्यालयात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांना अभिवादन!
सुनील घुमरे नाशिक विभागीय
प्रतिनिधी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संचालक व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री शामराव बोडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. शामराव बोडके यांनी क्रांतिवीरांचे जीवन व कार्य प्रेरणादायी आहे व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे उद्गार काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सानप यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक यांनी तरुण वयातच देशसेवेसाठी वाहून घेऊन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशसेवा केली व व्ही एन नाईक शिक्षण संस्था त्यांच्या प्रेरणेनेच काम करत आहे असे मनोगत व्यक्त केले . मराठी विभाग प्रमुख डॉ. महादेव कांबळे यांनी पुण्यतिथीनिमित्त क्रांतिवीरांच्या देशसेवेच्या कार्याचा आढावा घेतला व क्रांतिवीरांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय आहे व त्यांची सामाजिक बांधिलकी सर्वानी शिकण्यासाठी आवश्यकता आहे असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रल्हाद दुधाने यांनी प्रास्तविक केले तर प्रा. पंकजा अहिरे यांनी आभार मानले. या वेळी उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






