Nashik

अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर वनी पोलिसांची धडक कारवाई दारू विक्री करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश

अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर वनी पोलिसांची धडक कारवाई दारू विक्री करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लागू केलेले असताना काही ठिकाणी या निर्बंधांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. वनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन असल्याने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी तालुक्यातील अवैध दारूचे समूळ उच्चाटन करून कारवाई करणे बाबत आदेश दिले असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनी पोलीस ठाणे हद्दीत लॉकडाउनच्या अनुषंगाने बुधवार रोजी वणी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना काही भागात अवैध दारू विक्री होत असल्याबाबत खबर लागताच वणी पोलिसांनी अवैध धंदे चालू असणाऱ्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे.
कोल्हेर गावात धूम नामक तरुण अवैधरित्या चोरटे रीतीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हातभट्टीची गावठी तयार आंबट उग्र वासाची दारू विकताना मिळून आला त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे चार प्लास्टिक बिसलरी च्या बॉटल मध्ये आठशे रुपये किमतीची दारू मिळून आली, तसेच गोलदरी गावात पवार नामक इसम चोरटे रीतीने हातभट्टीची गावठी तयार आंबट उग्र वासाची दारू विकताना मिळून आला तपास पथकाने अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे दोन प्लॅस्टिक ड्रममध्ये दहा लिटर अंदाजे दोन हजार रुपये किमतीची दारू मिळून आली.
तसेच कादवा कारखाना जवळ बोपेगाव शिवारात लोखंडे नामक महिला अवैधरित्या चोरट्या रीतीने देशी प्रिन्स संत्रा दारूची विक्री करीत असताना मिळून आली.
तसेच वरखेडा येथील यादव गोतीसे नामक महिला अवैधरित्या चोरट्या रीतीने देशी प्रिन्स संत्रा दारूची विक्री करीत असताना आढळून आली.
या अवैध धंदे करणाऱ्यांवर वणी पोलिसांनी धडक कारवाई केली असल्याने तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

वरिष्ठांच्या आदेशान्वये तसेच पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर तसेच कळवन चे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना काही ठिकाणी अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळताच वनी पोलिसांनी छापे टाकत अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यापुढचे काळात देखील अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहोत. कोणाचीही गय केली जाणार नाही.

(स्वप्निल राजपूत-पोलीस निरीक्षक वणी पोलीस ठाणे)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button