Amalner: डॉ हिरा बाविस्कर यांचे एलएलबी परीक्षेत यश..!तालुक्यातील पहिल्या वकिलीची पदवी संपादन करणाऱ्या डॉक्टर..!
अमळनेर शिवम पॅथॉलॉजीच्या तज्ञ एम. डी. डॉ. हिरा शरद बाविस्कर यांनी नुकतीच विधी क्षेत्रातील एल. एल. बी. पदवी प्राप्त केली आहे.त्यामुळे वकिलीची ही उच्च पदवी प्राप्त करणाऱ्या त्या परिसरातील पहिल्या डॉक्टर ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे वैद्यकीय सेवा देत आपला प्रपंच सांभाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे येथे एलएलबी ला इंग्रजी माध्यमातुन नियमित प्रवेश घेऊन त्यांनी हे यश 84% गुण मिळवून प्राप्त केले आहे.
डॉ हिरा ह्या बालपणी राहुरीतील शाळा महाविद्यालयात सतत अव्वल क्रमांक मिळवून त्या टॉपर राहिल्या आहेत. त्यानंतर 12 वीत गुणवत्ता सिद्ध केल्याने 2000 साली पुणे येथील बी जे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले.
त्यानंतर 2005 साली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून पॅथॉलॉजी ची एम. डी. ही मास्टर पदवी प्राप्त केली. नंतर 2006 साली दिल्ली विद्यापीठातुन पॅथॉलॉजी विषयात डीएनबी ही वैद्यकीय शास्त्रातील उच्च पदवी मिळविली. त्यानंतर
अमळनेरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ शरद बाविस्कर यांच्याशी विवाहबद्ध
झाल्यानंतर आपल्या शिवम पॅथॉलॉजीत सेवा देत असताना शिक्षणाची ओढ कायम असल्याने आता 2022 साली एलएलबी देखील त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. केवळ शिक्षणातच नव्हे तर इतर कलागुणात देखील अग्रेसर आहेत. गेल्या सहा वर्षांपासून पर्यावरण पूरक शाडु मातीच्या सुबक मातीच्या सुबक गणपती मुर्त्या स्वतः काही मंडळांना बनवून दिल्या आहेत. पती डॉ शरद बाविस्कर यांच्या सोबत इतर कलाकृती देखील नेहमीच त्या साकारत असतात. एलएलबी पदवी प्राप्त केल्यानंतर डिप्लोमा इन मेडिकोलीगल सिस्टीम हा कोर्स करण्याचा त्यांचा मानस आहे. सदर एलएलबीचे यश मिळविल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.






