Faijpur

रेनूका कॉलनीतील नागरीकांचे आरोग्य धोक्यात फैजपूर न.पा. ने सांडपाण्याचा प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा_

रेनूका कॉलनीतील नागरीकांचे आरोग्य धोक्यात
फैजपूर न.पा. ने सांडपाण्याचा प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा_

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

फैजपूर- देशभरासह राज्यात काेरोनाचे रूग्णात दिवसोंदिवस वाढ होत असून आज जळगाव जिलिह्यात आज पुन्हा तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पॉझिटीव्ह रुग्णांचि एकूण संख्या १४ झाली आहे. त्यामूळे जळगाव जिल्हा आता REDZONE मध्ये आला आहे.

कोरोनाला आळा बसावा म्हणून प्रशासना तर्फे सर्वञ परीसर ‘सानिटाईज’ करण्यात येत आहे. माञ फैजपूर येथे परवा परवा दरम्यान दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते परंतु सर्वसामान्य जनतेच्या पदरी घोर निराशा येताना दिसून येत आहे एकीकडे संपूर्ण जग पुरणाच्या लढ्यासाठी लढायला सज्ज झाले असून फैजपुरात मात्र दूषित पाण्यामुळे प्रजा जणांचे जीव टांगणीला लागले आहे येथील रेनूका कॉलनीत मोकळ्या प्लॉट मध्ये सांडपाणी साचत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेला अनेकवेळा नागरीकांनी निवेदन देऊन उपोषण देखिल केले आहे,त्यावेळी उपोषण कर्त्यांना संबंधित व्यक्तिला नोटीस बजावण्याचे आश्वासन उपोषण कर्त्यांना दिले होते…परंतू त्यांनी नोटीस त्या व्यक्तिंनी दिली नाही. त्यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी यांनी नागरीकांना सांगीतले होते की शोषखड्डे तयार करून गटार बुजवून टाका, त्यावेळी बहूतांश नागरीकांनी शोषखड्डे तयार केले होते.परंतू मागील कॉलनीतील रहिवाशांनी शोषखड्डे तयार न केल्याने त्यांचे सांडपाणी मोकळ्या जागेत सांडपाणी साचल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून शहरात साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे नगरपालिका प्रशासनाच्या दूर्लक्षामूळे नागरीकांना नाहक माणसिक-शारीरीक ञास सहन करून धोका निर्माण झाला आहे. रेनूका कॉलनीतील सांडपाण्याचा प्रश्न त्वरीत न सोडवल्यास आत्मदहनचा ईशारा रहीवासी नागरीकांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button