? Breaking News..अमळनेर गटविकास अधिकारी झाले कार्यालयाचे हुकूमशहा..दाखल झालेल्या गुन्ह्या मुळे मती झाली भ्रष्ट..पंचायत समिती ला आज लावले कुलूप..अमळनेरआंदोलनाच्या नावाने हजेरी लावून पंचायत समिती प्रवेशद्वार आणि विविध विभागाच्या दरवाज्याना कुलूप लावून जनता , लोकप्रतिनिधी आणि दिव्यांग व बेरोजगार व्यक्तींना अडथळा निर्माण केला व जनतेला वेठीस धरून नागरिक व शासनाची फसवणूक करणाऱ्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांवर कारवाई करन्याची मागणी पंचायत समिती सदस्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी जिप च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.कामबंद आंदोलनाबाबत पंचायत समिती सदस्य आणि भाजप पदाधिकारींचा आक्षेप नाही मात्र कर्मचाऱ्यांनी हजेरी लावून पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वार तसेच विविध विभागाच्या दरवाज्याना कुलूप लावले त्यामुळे पंचायत समिती सदस्यांना आणि नागरिकांना तसेच दिव्यांग व्यक्तींना पंचायत समितीत प्रवेश करण्यास अडथळा निर्माण करण्यात आला आज दिव्यांग दिन असंल्यामुळे त्यांच्या मागणीसाठी त्यांना प्रवेश मिळाला नाही , लोकप्रतिनधीना जनतेला न्याय देण्यासाठी हेतुपुरस्कार अडथळा करण्यात येऊन जनतेच्या कामांना व्यत्यय निर्माण करून त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले.
विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांनी हजेरी लावून आंदोलनाबाबत दिशाभूल केली व पगार लाटण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करून सेवा पुस्तकात नोंद घेण्यात यावी. अन्यथा आठ दिवसात आंदोलन छेडले जाईल असा इशारा सभापती रेखाताई पाटील , उपसभापती भिकेश पाटील , पंचायत समिती सदस्य कविता पाटील , त्रिवेणीबाई शिवाजी पाटील , वजाताई नामदेव भिल या पंचायत समिती सदस्य व माजी सभापती श्याम अहिरे , भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील ,राकेश पाटील , शीतल देशमुख , बाजार समिती सभापती प्रफुल पाटील, प्रकाश पाटील , मच्छीन्द्र पाटील,सरपंच शरद पाटील,संजय पाटील,दिपक पाटील,राहुल चौधरी,पतींग पाटील,किरण पवार ग्रा प सदस्य,मिलिंद पाटील,सरपंच मायाबाई वाघ,शिवाजी पाटील,भाऊसाहेब पाटील,गुलाब खाटीक यांनी केली आहे.






