Amalner

बाजार समितीत शेतकऱ्यांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मा आमदार साहेबराव पाटील यांनी केले  रूमाल व मास्क वाटप

बाजार समितीत शेतकऱ्यांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मा आमदार साहेबराव पाटील यांनी केले रूमाल व मास्क वाटप

योगेश पवार

अमळनेर शेतकऱ्यांच्या हिता साठी कोरोना च्या पार्श्वभूमीवर देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू ठेवण्यात आला आहे. या मुळे तालुक्यातुनच नव्हे तर इतर ठिकाणाहून देखील मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत आपला उत्पादित माल घेऊन उन्हा तान्हात उभा असतो.या पार्श्वभूमीवर
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्वताच्या खिशातून १२,५०० रूमाल व मास्क असे जवळपास ५००००/ रूपये किंमतीचे विकत घेऊन शेतकरी बांधवांना वाटप केले.

चाळीस रूपायाचा रूमाल व मास्क आजपासून बाजार समितीत वाटप सुरू केले.अमळनेर बाजार समितीत शेतकरयांची गर्दी झाली कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल आणि मास्क मोफत वाटले यावेळी बाजार समिती सभापती प्रफुल पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, राजेश पाटील, प्रा रामकृष्ण पाटील हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button