Amalner

गांधली गावामध्ये उमेद अभियाना च्या तसेच बचत गटाच्या महिला यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत माहिती

गांधली गावामध्ये उमेद अभियाना च्या तसेच बचत गटाच्या महिला यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत माहिती

अमळनेर : गांधली गावामध्ये उमेद अभियाना च्या तसेच बचत गटाच्या महिला यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत माहिती हवी होती ग्राम संघाच्या सचिव राजश्री देशमुख ताई यांनी पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून गावातील महिलांना माहिती मनरेगा योजनेसंदर्भात मिळावी अशी विनंती केली त्यांच्या विनंतीस मान देऊन बचत गटाच्या महिलांना बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवडी संदर्भात सविस्तर माहिती दिली महिलांनी आमच्या गावातील 200महिला बिहार पॅटर्न अंतर्गत काम करण्यास इच्छुक आहेत असे सांगितले हे काम आपण नियोजित आराखड्यात घेऊ व पुढील वर्षी आपणास करता येईल त्याच बरोबर शेताची बांधबंदिस्ती तसेच पडीक जमिनी वरील व बांधावरील वृक्ष लागवड संदर्भात माहिती दिली व महिलांना आपली कामे नियोजित आराखड्यात व पुरवणी आराखड्यात मागणी देण्यासाठी कोण कोणती पद्धत अवलंबावी यासंदर्भात व यासंदर्भात कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहिती दिली महिलांनी खूप समाधानकारक माहिती मिळाली असा अभिप्राय दिला व आम्ही निश्चितच अशा पद्धतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांची मागणी करू व ती कामे करत राहू असे सांगितले पाणी फाउंडेशन चे समृद्ध गाव येऊ द्या मनोज श्री गणेश सर व नितीन चव्हाण सर हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button