Pune

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करणार – हर्षवर्धनजी पाटील

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करणार – हर्षवर्धनजी पाटील

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे -इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. इंदापूर पंचायत समिती व इंदापूर नगरपरिषद यांच्यामार्फत हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील जनता कर्फ्यू कालावधीमध्ये सर्व ग्रामपंचायत व नगरपरिषदे च्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, शिक्षक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
त्याच अनुषंगाने आज पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषजी प्रसाद, नगराध्यक्ष सौ. अंकिता शहा, गट विकास अधिकारी विजयजी परीट, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठेंगल जी यांच्या समवेत इंदापूर येथे जिल्हा परिषदेच्या सदस्य कु.अंकिताताई हर्षवर्धनजी पाटील यांनी चालू असलेल्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला.

आज पहिल्या टप्प्यात इंदापूर नगर परिषदेमार्फत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सी मीटर, पल्स मीटर व थर्मामीटर च्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करायला सुरुवात केली आहे. जे नागरिक तपासणीवेळी ज्या- ज्या नागरिकांना कोरोणाचे सिम्पटम्स दिसतील त्या नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात वाढणार धोका टळेल. असे प्रसंगी कु.अंकिताताई हर्षवर्धनजी पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button