?️अमळनेर कट्टा..EMSA संघटनेने शिक्षण उपसंचालक यांना शैक्षणिक धोरणाबाबत दिले निवेदन…
दि ५.४.२०२१ चे परिपत्रक मधिल परीच्छेद ८ वर आक्षेप घेणेबाबत.
उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती अर्ज करतो की आपल्या दि ५.४.२०२१ च्या परिपत्रकामधिल परिच्छेद ८ मध्ये आपल्या म्हणण्यानुसार विदयार्थ्यांचे शैक्षणिक वर्षातील वार्षिक निकाल पत्रक / गुण पत्रक / शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी अडवू नये . आपला हेतू खुपच उदात्त आहे कारण खरच या महामारीमुळे जन सामान्यांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे . परंतु महाशयांनी हाही विचार
करण्याची गरज आहे की एका संस्था चालकाला सुध्दा शाळा चालवणे दुरापास्त झाले आहे . कर्मचायांचा पगार, ज्यांच्या इमारती भाडेतत्वावर आहेत त्यांचे भाडे, लाईट बिल ज्यांनी विदयार्थी वाहतूकीसाठी वाहने घेतली आहेत त्यांचे हफ्ते अजुनही बरेच खर्च आहेत या सर्व गोष्टींची वहीवाट कशी लावावी याचे ही मार्गदर्शन महाशयांनी करावे.
पालक हव्या त्या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकतात त्यासाठी त्यांना संबधीत शाळेचा दाखला मागण्याची गरज नाही फक्त वयाच्या आधारावर त्या विधार्थ्यास प्रवेश मिळू शकतो . आमचा महाशयांना प्रश्न आहे जर सरळ असा प्रवेश मिळत असेल तर शासन चालवित असलेल्या सरल प्रणालीचे काय होईल जे विधार्थी एखादया शाळेत आधार कार्ड ने लिंक असतील व त्यांच्या स्कुल पोर्टलवर दिसत असतील तर अशा विधार्थ्याचे काय मग हा विधार्थ्यांचा आधार लिंकचा अटटहास कशासाठी? जर तो विधार्थी जन्म दाखल्यावर दुसया शाळेत प्रवेशित होत
असेल तर .आणि या निर्णयामुळे काही पालक शाळेत येऊन कर्मचायांना दमदाटया करत आहेत .
ज्या शाळा अतिरीक्त फी घेत असतील तर त्यांच्यासाठी हा निर्णय योग्य आहे परंतू काही शाळांमध्ये परिस्थिती खुपच विदारक आहे . गेल्या दोन वर्षापासून काही पालकांनी फी भरलेली नाही .आणि आपल्या या निर्णयामुळे दाखला देतांना पालक ती फी पण देणार नाहीत.मग संस्थाचालकांनी शाळा कशी चालवावी.
तरी महाशयांना नम्र विनंती आहे की जसे आपण हे परिपत्रक काढले तसे अजुन एक परिपत्रक काढून त्यात असे नमुद करावे की कुठल्याही शिक्षकास पगार देण्याची गरज, नाही कुठल्याही बँकेस हफ्ते भरण्याची गरज नाही, लाईट बिल भरण्याची गरज नाही, भाडे देण्याची गरज नाही. जर हे शक्य असेल तरच महाशयांनी वरील अट लादावी . अन्यथा शाळांना उर्वरित वाजवी फी घेण्याची मुभा दयावी.अशी मागणी उत्कर्ष पवार अध्यक्ष(EMSA) महाराष्ट्र राज्य यांनी अर्जाद्वारे केली आहे.






