रावेर तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत ; पोलीस,अन्न भेसळ, उत्पादन शुल्क प्रशासन अज्ञभिन्न आहे काय?
गुटखा,देशीसह गावठी दारुचाही पारा चढला
सावदा, मोठा वाघोदा,निंभोरा, रावेर ,भाटखेडा अवैध गुटखा माफियांचे केंद्रबिंदू
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा
सावदा, मोठा वाघोदा,भाटखेडा येथील किराणा दुकानांतून होतेय गुटखा,बिडी, सिगारेट तंबाखू पान मसाला ची विमल पाकिट ५७०, रुपये,बिडीपुडा ६५० रुपये सुपारी ७०० रुपये तर सिगारेट तंबाखू तिप्पट भावाने विक्री केली जात आहे तर देशी दारूचा ४२ रु चां चप्पा २५० रुपयांला तर गावठी चां १० रु चां पैग ५० ला विकला जात आहे वया अवैध धंदेवाल्यांची या लॉकडाऊन मध्ये चांदी होत आहे
रावेर तालुक्यातील गावा-गावात पोलीस सध्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना नियमांचा पाढा वाचून दाखवितात मात्र, अवैध धंद्यावाल्यांना खुली मोकळीक दिली जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे नागरिकांतून उपरोक्त परिसरातील हद्दीसाठी (बीट)कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या भूमिके बाबतीत तीव्र नाराजी जनसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असूनही सहजपणे मोकळीकपेक्षा काळ्याबाजारात नाकाबंदी असतांनाही एवढा मुबलक प्रमाणात अतिरिक्त गुटखा बिडी सिगारेट,पान मसालासह देशी गावठी दारु पुरवठा उपलब्ध होतोच कसा ?दुप्पट तिप्पट दराने विकला जानारा गुटखा, तंबाखू व देशी,गावठी दारू सर्वत्र दुर्मिळ झाली आहे व त्यामुळे त्याची वाढती मागणी आणि काळ्या बाजारात अवैध काळ्याबाजारींचे गगनचुंबी चढ्या दराने विक्री सुरू आहे. गुटखा व गावठी दारू तर सर्रासपणे गावातील चौका चौकात गल्ली-बोळांमधील किरकोळ होलसेल किराणा दुकानांवर विक्री होतेय व तीही चढ्या दराने विक्री होत असल्याने सामान्य नागरिकांची दिवसाढवळ्या लुट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्याभरात पोलीस कौतुकास्पद कामगिरी बजावत असतांना अनेक ठिकाणी गावठी दारूचे अड्डे पोलिसांकडून उध्वस्त केले जात आहे. मात्र रावेर तालुक्यातील काही भागात गावठी दारु विक्रेत्यांना पोलिसांचा काही एक धाक राहिलेला नाहीये ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. त्यात पत्ता जुगार वाल्यांनी आता आपला मोर्चा पत्यांचा क्लब रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जानोरी,सावखेडा ,चिंचाटी,च्या जंगलात नेत शेतशिवारात जुगार चां डाव मांडत आहेत व या जुगारींनी जंगलवनात धुमाकूळ घातला आहे संपूर्णपणे शेतकरी वर्ग, महिला शेतमजूर हे धास्तावले आहेत, कारण शेतात दिवसा ढवळ्या हे जुगारी मोठ्या संख्येने मद्यधुंद अवस्थेत असतात, व त्यांची भाषा आणि नजर हि विशेष करून शेतमजूर महिला साठी, शंभर टक्के दुरव्यवहाराची वाटते, म्हणून महिला संरक्षणासाठी आणि शेतकरीही या जुगारी, दारुदारूडयांना वैतागले आहेत.
या जुगारी, दारूडयांकडून मका, केळी, सह अन्य पिकांच्या नासधूस मोठ्या प्रमाणात मुद्दाम हून हे जुगारी मोठ्या प्रमाणात नुकसान करून जुगारी आपली दहशत निर्माण करीत असल्याची चर्चा ही शेतकरी वर्गातून होत आहे तरी पोलिस प्रशासनाकडून लॉक डाऊन च्या काळात सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या व अवैध गुटखा बिडी सिगारेट मसाला यांचा काळाबाजार व जादा भावाने विक्री करणाऱ्या भ्रष्ट लुटारू दुकानदारांना व संचारबंदी जमावबंदीचे आदेश धुडकावून लावणार्या जुगार किंग यांना पोलिसांनी वेळीच लगाम लावावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे तसेच पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन देशात लागू केलेल्या आदर्श लॉक डाऊन चे उल्लंघन करणाऱ्या जुगारींवर व अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर अव्वाच्या सव्वा दर आकारणी करून जनसामान्यांची लूट करणाऱ्या भ्रष्ट काळाबाजार करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी अशी मागणीही जोर धरत आहे.






