Chalisgaon

विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेतील ठळक मुद्दे:

विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेतील ठळक मुद्दे:

मनोज भोसले

अजून ही खातेवाटप तात्पुरते, असे ज्येष्ठ मंत्री ट्विट करून सांगतात. उत्तराचे दायित्व कोणत्या मंत्र्यांचे, हे स्पष्ट नाही. नागपूर अधिवेशन हा कागदोपत्री फार्स.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून मदत नाही. नवीन सरकार येऊन कोणताच निर्णय नाही. उद्धव ठाकरे यांनी 25 हजार रुपये हेक्टरी मदत मागितली होती, तीही सरसकट आणि कोणतीही अट न ठेवता. पण एकही बैठकीत चर्चा, निर्णय होत नाही.
23 हजार कोटी रुपये तातडीने या सरकारने शेतकऱ्यांना द्यावेत. याची सरकारला या अधिवेशनात सातत्याने आठवण करून देणार.

सरसकट कर्जमाफी आणि सात-बारा कोरा, या बाबतीत सुद्धा ठोस कार्यक्रम सरकारला द्यावा लागेल. या मागण्या त्यांनी केल्या होत्या. त्याची त्यांना आठवण करून, पाठपुरावा करणार.

हे स्थगिती सरकार आहे,
त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष तयार झाला आहे. नागरिकांवर तर परिणाम झालाच, पण गुंतवणूकदार सुद्धा आता महाराष्ट्राकडे येणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जाणीवपूर्वक आणि भविष्यात हात वर करता यावे म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीचे चित्र निर्माण केले जाते आहे. शिवसेना गेली 5 वर्ष आमच्यासोबत सत्तेत होती. सामूहिक जबाबदारीतूनच आम्ही सोबत निर्णय घेतले.
राज्याची आर्थिक स्थिती उत्तम.

चर्चेची संधी दिली, तर चर्चेच्या माध्यमातून,
नाही दिली, तर विविध आयुधं वापरून जनतेचे प्रश्न सोडवू.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गाथा राहुल गांधी यांनी पाहिली नाही, त्यांना त्याची जाण असण्याचा प्रश्नच नाही.
वीर सावरकर यांनी जे बलिदान केले, ते राहुल गांधी यांना समजणे शक्यच नाही. उभा देश यामुळे पेटून उठला आहे. शिवसेना इतकी सौदेबाजी करेल, याची कल्पना केली नव्हती.

सत्तेसाठी लाचारी शिवसेनेला लखलाभ!
कालपर्यंत जितकी आक्रमक शिवसेना याबाबतीत होती, तशी आता राहिली नाही.
कालचे शिवसेनेचे वक्तव्य पाहून शिवसेनेची कीव करावीशी वाटते.

ना मंत्री, ना निर्णय
हे केवळ स्थगिती सरकार!
वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या चहापानाला आम्ही जाणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button