India

?Big Breaking…आयपीएल चा कोरोना..कोलकत्ता पाठोपाठ आता चेन्नईचे 3 सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह

?Big Breaking…आयपीएल चा कोरोना..कोलकत्ता पाठोपाठ आता चेन्नईचे 3 सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह
भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच सध्या भारतात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. या हंगामाचा पहिला टप्पा सुरळीच पार पडला होता. मात्र, दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच मोठे धक्के बसत आहेत. नुकतेच असे वृत्त येत आहे की चेन्नई सुपर किंग्स संघातील ३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण चेन्नई संघ दिल्लीच असून उर्वरित संघातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. रविवारी कोरोनाची चाचणी केल्यानंतरचे हे अहवाल आहेत.
त्याचबरोबर असेही समजत आहे रविवारच्या चाचणीचा अहवाल खरा आणि की खोटा हे तपासण्यासाठी विश्वनाथन, बालाजी आणि संघाच्या देखभाल करणाऱ्या टीममधील सदस्याची पुन्हा सोमवारी सकाळी तपासणी झाली आहे. जर त्यांना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला तर त्यांना १० दिवसांसाठी बायोबबलमधून बाहेर जाऊन क्वारंटाईन रहावे लागेल आणि त्यानंतर २ निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच पुन्हा संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश करता येईल.
विशेष म्हणजे हे वृत्त येण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील सोमवारचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button