चाचडगाव येथे संविधान दीन साजरा
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
दिंडोरी:- चाचडगाव ता दिंडोरी जि नाशिक येथे माझे संविधान माझा अभिमान या अंतर्गत आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे व भारताचे संविधान या पुस्तकाचे पूजन करून संविधान वाचण्यात आले.
आज दि.26नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.संविधान दिनाची माहिती सुनिल पद्माकर पाटील पेलमहाले यांनी सांगितली.
याप्रसंगी सरपंच हर्षदा दिगंबर गावंढे, उपसरपंच मणुबाई बाळू पेलमहाले ,अलका गांगोडे,ग्रामसेविका मंगला गायकवाड वसंत बोके व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






