Maharashtra

प्रेम,भावना,मदत,विश्वास,सहकार्य,व्यवहार शून्य,स्त्री पुरुष भेद रहित दिवस उजाडेल तोच खरा मैत्री दिवस असेल…

प्रेम,भावना,विश्वास ,मदत,सहकार्य ने युक्त आणि व्यवहार शून्य,स्त्री पुरुष भेद रहित दिवस उजाडेल तोच खरा मैत्री दिवस असेल…
जाणून घ्या मैत्री दिनाचे महत्व….

प्रेम,भावना,मदत,विश्वास,सहकार्य,व्यवहार शून्य,स्त्री पुरुष भेद रहित दिवस उजाडेल तोच खरा मैत्री दिवस असेल...

संपादकीय प्रा.जयश्री साळुंके दाभाडे

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (किंवा फ्रेंडशिप डे) जगातील अनेक देशांमध्ये दरवर्षी 
 हा सण जगभरात वेगवेगळ्या तारखा साजरा केला जातो, परंतु त्यामागील भावना सर्वत्र सारखीच आहे – “मैत्रीचा आदर”. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये सुरू झालेला हा उत्सव 20 जुलैला उरुग्वे, अर्जेंटिना, ब्राझील, 30 जुलैला पराग्वे, तर भारत, मलेशिया, बांगलादेश इत्यादी दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
श्रावण मास हा  प्रत्येक वर्गासाठी खास आहे. महिला-पुरुष आणि युवक-युवतींशी संबंधित अनेक सण फक्त श्रावणात येतात. उत्सवांचे सौंदर्य प्रत्येकाला श्रावणीचा रंग देत आहे.
विशेषत: तरुण लोक ऑगस्टमध्ये उत्सव उत्सुकतेने आणि उत्साहाने साजरे करतात. ते या उत्सवांसाठी केवळ विशेष तयारी करत नाहीत तर त्यातील एक महत्त्वाचा भाग बनतात.तारुण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना विशेष असतो. श्रावण केवळ त्यांनाच आकर्षित करत नाही तर त्याच वेळी फ्रेंडशिप डेने त्याला त्याच्याशी मैत्री करण्यास उद्युक्त केले, म्हणूनच हा दिवस बाजारपेठेपासून कॉलेज कॉरिडोरपर्यंत आतुरतेने वाट पाहत असतात.
बाजारात पाहायला गेलं तर फ्रेंडशिप-डे साठी यंगस्टर्स आतापासून वेगवेगळ्या प्रकारच्या गिफ्ट्स शोधण्यात व्यस्त आहेत.
खरचं मैत्री ही “मैत्री” सारखी असते का?की असतो फक्त व्यवहार?जुन्या काळातील मैत्री च्या व्याख्या किती वेगळ्या होत्या.जीव लावणं,काळजी घेणे, संकटात हात न सोडणे,मदत करणे हे सगळे म्हणजे मैत्री असायची आधुनिक काळातील तरुणाई त्या दृष्टीने मैत्री करते का?खोलवर जाऊन मैत्रीचा अर्थ समजून घेतला जात नाही. आज मैत्री म्हणजे फक्त वस्तू देणे घेणे ,बँड बांधणे, फोन करणे, msg करणे एवढ्या पुरतेच मर्यादित आहे.तरुणाईला थोड्या कालावधी साठी आकर्षण असतं मैत्रीचं मग नवा भिडू नवं राज्य प्रमाणे नवे नवे दोस्त बदलत राहणे याला मैत्री म्हणताच येणार नाही. सेल्फी काढून पोस्ट करणे म्हणजे मैत्री नव्हे तर प्रामाणिक पणे ती निभावणं म्हणजे मैत्री.. 

प्रेम,भावना,मदत,विश्वास,सहकार्य,व्यवहार शून्य,स्त्री पुरुष भेद रहित दिवस उजाडेल तोच खरा मैत्री दिवस असेल...
भारतात स्त्री पुरुष मैत्री बद्दल तर बोलायलाच नको…येथील समाज व्यवस्था अनैतिक संबंध,विवाहबाह्य संबंध, घरातील लोकांकडून होणारे शोषण याला मान्यता देतो पण स्त्री पुरुष मैत्री मात्र समाजाला मान्य नाही. अशी निकोप, निखळ मैत्री झाली तरी त्याला “लफडं” या दृष्टीने  पाहिलं जातं.त्यात वय, गरिबी ,श्रीमंती,दिसणं वै लक्षात घेतलं नाही.भारतीय समाज,संस्कृती अजूनही स्त्री पुरूष निखळ मैत्री बंधनात एकमेकांना समजून घेण्यासाठी सक्षम असतात हे समजून घ्यायला तयार नाहीत.कदाचित अपूर्ण ज्ञान,संकुचित मानसिकता,सेक्स बद्दल गैरसमज, भीती,दडपण इ कारणे कारणीभूत असू शकतात. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रेम,भावना,मदत,सहकार्य,व्यवहार शून्य,स्त्री पुरुष भेद रहित दिवस उजाडेल तोच खरा मैत्री दिवस असेल…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button