शिरूड परिसरात मक्याला वादळ वाऱ्याचा फटका मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसानरजनीकांत पाटीलअमळनेर : शिरूड 17 रोजी सकाळ पासून वातावरण बदल जाणवत असल्याने उष्णता व उकाडा जाणवत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक आलेल्या वादळी वारे,जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी वर्गात मोठया प्रमाणात धावपळ झाली.
अमळनेर परिसरात संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शिरूड परीसरात मक्याचे उभे पीक आडवे झाले आहे. मका वाऱ्यामुळे आडवा, जमीनदोस्त पडला असल्याने शेतकरी वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.या मुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास गेला असून शेतात केलेला खर्च देखील कसा निघाणार नाही या बाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व नाराजी व्यक्त होत आहे.सर्व नुकसान ग्रस्त भागाचेव त्वरित पंचनामे व्हावेत यासाठी तालुका कृषिअधिकारी व तहसीलदार यांना तात्काळ निवेदन देण्यात आले.यावेळी गावतील मा जी.सभापती श्याम अहिरे शिरूड ,सरपंच सुपडू पाटील, माजी सरपंच बापूराव महाजन तसेच गावातील शेतकरी भूषण भालेराव पाटील,किरण संजय पाटील इत्यादींची उपस्थिती होती.






