मुस्लिम बांधवांनी मोहरम निमित्ताने १११ बेवारस मनोरूगणांना दिले स्वादिष्ट भोजन
अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने इस्लाम धर्मांचे प्रथम महिना मोहरमच्या निमित्ताने चोपडा तालुक्यातील वेले येथे मानव सेवा तिर्थ ह्या आश्रमातील १११ बेवारस मनोरूगणांना गुलाबजामुन व स्वादिष्ट भोजन देण्यात आले तसेच चोपडा येथील अमर संस्थाचे संस्थापक अध्यक्ष चंदू अण्णा पाटील, चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा आणि मानव सेवा तिर्थाचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील व त्यांचे सहकार्यांचे सत्कार ही करण्यात आले याचवेळी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ता नविद शेख यांची नुकतेच अमळनेर तालुका रेल्वे सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे ही सत्कार करण्यात आले
मानव सेवा तिर्थ विषयी नरेंद्र पाटील यांनी सविस्तरपणे माहिती दिली तर संस्थाचे अध्यक्ष यांनीही अनाथाश्रम व मुले मुलींच्या निवासाची संपूर्ण माहिती देऊन समक्ष वर्ग,भोजनालय कक्ष, गोशाळा,सह पूर्ण इमारतीच्या सोयीसुविधा दाखवली या प्रसंगी अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तानाचे अध्यक्ष फयाज पठाण, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार मास्टर, सैय्यद शौकत अली, शमशेर खान ( पप्पू दादा ), कमर अली शाह, जब्बार खा पठाण, मोहम्मद इकबाल शेख,कौसर शेख, अँड शकील काझी, अँड अब्दुल रज्जाक शेख, शब्बीर शेख, अखलाक शेख, शराफत अली सैय्यद,चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अकरम तेली, मुस्तफा सेठ, मसुद मिस्तरी, फयाज सर, हाजी रफीक तेली, इकबाल शेख, फारूख सुरभी, अताउल्ला सर,कमाल शेख, मुश्ताक सर, इम्रान शेख,जाविद पेंटर,जमालोदीन शेख, अख्तर अली,नविद शेख, रियाज ठेकेदार,जाकीर बागवान,शकील शेख, अख्तर तेली,राजु लोहार,अज्जु बागवान,अरमान पठाण मेवाती, अशफाक शेख सह आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते कार्यक्रमात सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन मोहम्मद इकबाल शेख यांनी केले






