लॉकडाऊन काळात जऊळके व जानोरी ग्रामस्थांचा उपक्रम
राष्ट्रीय महामार्गाने पायी जाणाऱ्यांना सतरा दिवसापासून अखंड अन्नदान
सुनील घुमरे
जानोरी ता.3: कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे रोजगार बंद असल्याने मुंबई नाशिक सह शहरात असलेले परजिल्ह्यातील, परराज्यातील सर्व कामानिमित्त आलेल्या कामगारांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परंतु दुसऱ्या टप्प्यात पुन्हा लाॅक डाऊन वाढल्याने आपला उदरनिर्वाह कसा करायचा म्हणून शेकडो लोकांनी मुंबईकडून मालेगाव ,धुळे, शेगाव, चाळीसगाव तसेच गुजरात, मध्य प्रदेश येथे आपल्या घराकडे पायी वाटचाल सुरू असून या मंडळींना शासनस्तरावरून जी काही मदत शक्य आहे ती पुरवण्याचे काम शासन करीत असले तरी रोज गाव बदलणे किंवा रस्त्याने पायी चालणे यामुळे संबंधित नागरिक, महिला, बालके या सर्वांचेच उपासमारीने हाल होत असल्याचे दिस toत होते. म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर दहावामैल येथे दिंडोरी तालुक्यातील जऊळके( दिंडोरी) व जानोरी (नाशिक एअरपोर्ट) या दोन्ही गावांनी मिळून गेल्या सतरा दिवसापासून पायी जाणाऱ्या प्रत्येकाला माणसाला भाजी पोळी व पाण्याची बाटली देऊन अन्नदानाचा वाटा उचलण्याचे काम जऊळके चे उपसरपंच तुकाराम जोंधळे व शेतकरी कॉलनी परिसरातील नागरिक करत होते. एवढेच नव्हे तर पायी चालणा-यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी लहान मुलांना दूध, चॉकलेट, बिस्किटे, मोबाईल चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून दिले. परंतु पायी जाणाऱ्यांची संख्या रोज वाढतच होती म्हणून जानोरी ग्रामस्थांनी त्या अन्नदानात सहभागी होण्याचे ठरवले व गेल्या दहा दिवसांपासून जानोरी चे उपसरपंच गणेश तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरी येथूनही रोज हजार-बाराशे पोळ्या, तेलाचे डबे, भाजीपाला, पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम करण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून कोराटे,शिवनई व आंबेदिंडोरी येथील ग्रामस्थांनीही यात सहभाग घेतला.या माणूसकीच्या उपक्रमाबद्दल विशेष ता जऊळके व जानोरी बरोबरच कोराटे,शिवनई,आंबेदिंडोरी ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत आहे .
जऊळके व दहावा मैल येथे शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार कोरोणा संक्रमण होणार नाही यासाठी जनजागृती, नाका-बंदी, गावात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद, गावातील गरजू कुटुंबांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे अन्नधान्य वाटपा बरोबरच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशांना जीवनावश्यक वस्तूचे लोकवर्गणीतून वाटप, गावात येणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांचे सॅनिटायझेशन अशा सर्व उपाय योजनांनी गावाला कोरोणा संक्रमणापासून रोखले. हे सर्व करत असताना राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या शेकडो कामगार ,बायका व छोट्या छोट्या मुलांना भुकेने व पाण्याने व्याकूळ झालेले बघितले .म्हणून जऊळके ग्रामस्थांच्यावतीने रोज भाजी-पोळी देण्याचा उपक्रम सुरू केला त्याला विशेषता जानोरी ग्रामस्थांनी व कोराटे,शिवनई, आंबे ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन मदत केली. अन्नदाना बरोबरच आतापर्यंत साडेसात हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. हे सर्व करत असताना शासनाच्या आदेशाचे पूरेपूर पालन करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कामी दहावा मैल येथील तरुणांची विशेष मदत झाली. यापुढेही जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवणार असून यामुळे आम्हा ग्रामस्थांना गावाबरोबरच इतरांनाही मदत करू शकलो याचे समाधान वाटते.
— तुकाराम जोंधळे, उपसरपंच जऊळके
दहावा मैल: जानोरी ग्रामस्थांकडून तेलाचा डबा, पोळ्या व भाजीपाला तुकाराम जोंधळे यांच्याकडे सोपवतांना उपसरपंच गणेश तिडके शंकरराव काठे आदी ग्रामस्थ.






