सुरगाणा तालुक्यातील जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन कॉ जे पी गावित
प्रतिनिधी विजय कानडे
जिल्ह्यातील सुरक्षित तालुका म्हणून ओळखल्या गेलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना चा शिरकाव झाल्याने जनतेत भीतीचे वातावरण आहे, सुरगाणा 3 आणि बोरगाव 1 असे चार कोरोना रुग्ण सापडले असून तालुक्यात गावो गावी भीती पसरली आहे. याच परिस्थितीचा आढावा घेत तालुक्याचे कैवारी माजी आमदार कॉ जे पी गावित यांनी सुरगाणा, बोरगाव येथील परिस्थितीचा आढावा घेऊन तालुक्यातील इतर गावातील जनतेला सुरक्षित राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.हा संसर्ग रोखन्यासाठी बाहेरील कोरोना ग्रस्त तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आरोग्य तपासणी शिवाय आपल्या संपर्कात येऊ देऊ नये, येऊन जाऊन करणारे विविध कर्मचारी पदाधिकारी यांच्याशी जवळीक साधतांना सोसिअल distansing पाळून आपली अडचण सोडवून घेतली घ्याव्यात , त्यांना निवासी राहण्याच्या सूचना द्याव्यात, वेळोवेळी तपासणी करावी, जनतेने आपल्या अडचणी सावध पणे सोडवून घ्याव्यात आणि आपल्या लोकांना अडचण नसेल नसेल तर कारण नसताना त्यांच्या संपर्कात जाऊ नये, बोरगाव सुरगाणा, उम्बरठाण आणि बाऱ्हे ह्या सुरगाणा तालुक्यातील मुख्य बाजारपेठा आहेत या ठिकाणी कडक नियमावली लावावी. गरजू लोकांनाच आणि कामापुरतेच तेथे परवानगी द्यावी, गर्दीतून संसर्ग लवकर पसरतोय म्हणून गर्दी टाळावी, सदरची जबाबदारी नगरपंचायत नगरसेवक तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य ग्रामसेवक,पोलीस पाटील आणि गावातील प्रमुख कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन कडक नियम करावेत. जनतेने सहकार्य करून या जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे. तालुक्यातील प्रत्यक नागरिक सुरक्षित राहावा यासाठी लॉक डाऊन चे नियम काटेकोरपणे पाळने अत्यन्त महत्वाचे आहे. स्वतःचे आरोग्य सांभाळावे, छोटे मोठे आजार झाले तर त्वरित दवाखान्यात जावे, मास्क वापरावेत, स्वछता पाळावी, वेळोवेळी काळजी घयावी, समुदाइक ठिकाणी गर्दी करू नये, जनतेने न घाबरता या संकटाला तोंड देऊन याचा सामना करावा आपले आपल्या परिवारातील सर्व लहान थोर सदस्यांचे आरोग्य सांभाळावे, आपण सर्व कोरोना मुक्त राहावे असे आवाहन कॉ. जे पी गावित यांनी केले आहे …..
Rh…… ???
“काळजी घ्या
सुरक्षित रहा….”
*जीवन बहुमूल्य आहे*






