Maharashtra

माझ्या_बायकोची_बकेटलिस्ट..

#माझ्या_बायकोची_बकेटलिस्ट…

माझ्या_बायकोची_बकेटलिस्ट..
संपादकीय प्रा.जयश्री साळुंके 
टिव्ही वर वीणा वर्डची जाहिरात चालू होती.आणि त्या वीणा मॅडम माहिती देत होत्या. 
सुट घातलेला, तो बॉबकट. 
बॉबकटवरून आठवलं ती फाल्गुणी पाठकची पण अशीच हेअर स्टाईल आसते. कतरिना फिकि पडते प्रियंका गांधी पुढे. कुछ कुछ होता है मध्ये काजोल अशा हेअरस्टाईलने काय फंटर दिसते नाय का!! अरे हा मी काय विचार करतोय. एक एक चित्र वाढतच चालले आहे. पण तेवढ्यात अजून एक चित्र डोळ्यासमोर आले. तेच ते किचनमधले. मला एकदम आठवले, त्यादिवशी बायको मला म्हणाली होती,”अहो बघितले का? माझे केस किती आखूड झालेत. किती लांडे दिसायलेत बघा!! परवा लग्नात मामाची मुलगी म्हणत होती केशकिंग लावत जा. . . 
आनता का माझ्यासाठी.”
क्षणात मी सैरभैर झालो, अरे हे काय त्यादिवशी तिचे लहान होत असलेले केस बघून मी निराश झालो होतो आणि आज काजोल फंटर वगैरे वगैरे. मला कुठेतरी चुकल्यासारखे झाले. काय वाटले कुणास ठाऊक तसाच उठून स्वयंपाकघराकडे गेलो.हि पाण्याच्या पाच सहा बाटल्या भरून फ्रिजमध्ये ठेवत होती. मला पाहताच हिचं चालू झालं,
 “पाणी पिल्यावर बाटली लगेच भरून ठेवायचं कळत नाही का. सगळे येतात फक्त पाणी पितात आणि तसेच निघून जातात बाटल्या रिकाम्या ठेवून. दिवसातून दहा बारा वेळेस मला हे पाणी भरून ठेवावे लागते. किती तरी कामे असतात पिले तसे भरले तर माझे एक काम हलके होणार नाही का?? किती करावं लागतं मला.” 
काय यार कशाला उठून आलो मी इकडे. एक ती विणा ‘मी हि सेवा देते,ती सेवा देते’म्हणून जाहिराती करते आणि हिची सारखी बडबड ‘हे करायला लावता ते करायला लावता’.तसाच माघारी येवून सोफ्यावर बसलो. दहा पंधरा मिनिटानी तीच जवळ आली. मी आपले मोरव्या सारखे थोबाड करून टिव्हीकडे बघितले. मनात एवढच आलं की आता अजून ही काय किरकिर करते काय माहिती. पण प्रत्येकवेळेसारखे तिनेच बाजी मारली आणि म्हणाली,” किचन मध्ये कशाला आला होतात?? काय पाहिजे होते का??” 
“अरे तुम्ही बायका काय ठरवूनच वागता काय”
“नाही हो, बघा ना एवढी कामे असतात त्यात ते बाटल्या भरायचे काम, बरे आत्यानी बाटल्या भराव्या असे म्हणत नाही पण शेजार्याना द्यायची काय गरज आहे का. दिवसातून निम्म्या बाटल्या बाहेरच जातात. पाणी जपून वापरावे.” मुन्सीपालटीला आनंद होईल असे हृदयस्पर्शी वाक्य बोलून पुढे म्हणाली,”बरे ते जाऊद्या का आलतात ते सांगा ना??
किती लाजीरवाणी परिस्थिती ना! तिने किती दिवसापुर्वी केशकिंग आणा म्हटलेले, मी त्याकडे पुरते दुर्लक्ष केलेले. आणि हि एवढी वैतागलेली, थकलेली तरी पण लक्षात आल्यावर लगेच येवून चौकशी करतेय. मी एवढ्या दिवसात एकदा जरी तिला म्हणालो असतो की आज केशकिंग आणायला गेलो होतो पण दुकानात नव्हते उद्या नक्की आणतो, तर तिला किती आनंद झाला असता ना!! म्हणलं एवढ्यात चान्स मारून घ्यावा,
” काही नाही गं ते तुला केशकिंग आणायचं माझ्या लक्षात राहिलं नव्हतं उद्या नक्की आणतो म्हणून सांगायला आलो होतो.”
“राहुद्या आता मी कोरफड लावलेय.” 
अजुन एक टोला ठरवूनच असेल कदाचित. 
काहीही असो मी खूपच बेचैन झालो. आपल्यासाठी इतका वेळ देणार्या व्यक्तीला आपण किती वेळ देतोय?? कुठले हो,खरे तर वेळच देत नाही!! नाही पण आज वेळ द्यायचाच. पण आता सुरूवात कुठून करायची. पटकन आठवले, मी बर्याच वेळेस मी दुपारी अचानक घरी आल्यावर पाहिले होते हि टिव्हीपुढे रजिस्टर घेवून बसलेली. बघुयात काय आहे ते. फरताळीत वरच्या बाजूला ठेवलेले ते रजिस्टर घेवून चाळू लागलो. दोन क्वायरचे आख्खे रजिस्टर रेसिपीने भरलेले. आणि वर टायटल पण मस्त ” आम्ही सारे खवय्यै”. प्रत्येक पान चाळत होतो. नवनविन पदार्थ, पण प्रत्येक रेसिपीच्या खाली स्वताची सही. . . . . तसेच रजिस्टर ठेवले. अजून एक सुन्नपणा. भेंडी,शेवगा,कोबी,वरण यापलिकडे कुठल्या मेनुची आजपर्यंत अपेक्षाच केली नव्हती. ती कितीदा म्हणाली हे करू का ते करू का पण छे कधी लक्षच दिले नाही मी. . . . 
“आज मला ढोकळा खाऊ वाटतोय”
“खरे बोलताय का”
“हो, थांब मी लगेच घेवून येतो”
“त्यापेक्षा मी घरीच बनवते ना”
“पण तुला जमतो का”
“हो, आम्ही सारे खवय्ये मध्ये शिकलेय मी आणि एकदा बनवला पण होता. पण तुम्हाला आवडत नाही ना म्हणून शेजारच्या काकूंना दिला होता. तेव्हापासून ती सारखेच म्हणते कधी करणार आहेस ढोकळा म्हणून”
आणि काय तो अस्वाद होता राव ढोकळ्याचा. या अप्रतिम रेसिपीला किती मुकलो होतो मी. अन आजचा योग आला नसता तर न जाने कधी खाउ शकलो असतो की नाही. त्यापेक्षा जास्त दुख होतेय ते दुर्लक्षीतपणाचे. आपल्या स्वताच्या ईच्छा अपेक्षा पुर्ण करताना दुसर्याच्या इच्छा अकांक्षाकडे ज्या आपल्यावर अवलंबून आहेत त्याकडे किती सहज दुर्लक्श करतो ना आपण!!!
तिचे तर पोट मी ढोकळा खातानाच भरले होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की मी,, होय होय मीच तिने बनवलेला ढोकळा खातोय. चवच अशी होती. खरोखरच तिचा ढोकळा एवडा सुंदर झाला होता की माझ्या आतुरतेने त्याला चविस्ट बनवलेले होते किंवा तिची उत्सुकता पण असेल. पण जर मी याचे मार्केट केले तर तो या भागातला एक ब्रॅण्ड बनेल. इथे येणारा प्रत्येक पर्यटक ढोकळा खाल्ल्याशिवाय जाणार नाही. 
मला तिच्या एकएक इच्छा,स्वप्न आठवत चालले. “मला स्कुटी चालवायची आहे”, “त्या आर्चीसारखे पोहायचे होते पण भैय्याने शिकवलेच नाही”, “पिको फॉल चालु करायचे का??” आठवड्यातून एकदातरी फिरायला जाउयात ना”!!
वगैरे वगैरे असंख्य असंख्य. . . 
अजुनही वेळ गेलेली नाही. हळूहळू का होईना पण एक इच्छा पुर्ण करुयात. काही राहतीलही पण एक जरी योग्य पुर्ण झाली की मनसोक्त आनंद होईल. लग्नानंतर आज पहिल्यांदाच हातावर मेहंदी काढण्याचा मोह झाला. मेहंदी काढणं महिलांच्या रक्तातच असतं की काय माहित. पण आजची नक्षी खूपच चमकदार होती. .
आज बहुतेक ती झोपणार नाही. 
पण मला झोपायचय. . 
सकाळी लवकर उठून मार्केटला जायचय. . . . .
केशकिंग आणायचय ना!!!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button