Nashik

निफाङ चे आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांना यश तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा

निफाङ चे आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांना यश
तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा

मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -: निफाड तालुक्याचे गतकालीन वैभव असलेले निफाड व रानवड हे सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री नामदार विश्वजीत कदम ,आमदार दिलीप बनकर यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

नाशिक जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना व इतर दोन खाजगी साखर कारखाने सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागते. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आठ हजार हेक्टर क्षेत्रावर १० ते १२ लाख मे.टन उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर (रानवड) व निफाड सहकारी साखर कारखाना लि., पिंपळस हे दोन सहकारी साखर कारखाने व केजीएस शुगर इन्फ्रा प्रायव्हेट लि. हा एक खाजगी साखर कारखाना आर्थिक अडचणींमुळे गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे. यातील दोन सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालू होऊ शकतात. यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी मी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.
सदरचे दोन्ही साखर कारखाने निफाड तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत व स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळगाव बसवंत या शेतकरी सभासद असलेल्या संस्था असून ऊस उत्पादक शेतकरी व या संस्थेचे सभासद हे साधारणत एकच आहेत. या दृष्टिकोनातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने कुठल्याही मार्गाने चालू करावे याकरिता सदर संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागणी केली होती. त्या अनुषंगाने या दोन्ही सहकारी संस्थांना कारखाने कसे भाडेतत्वावर चालविण्यास घेता येतील याकरिता प्रयत्न सुरू होते. या संस्था ज्या कायद्याने स्थापन झालेल्या आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून परवानगी घेणे व दुसरा पर्याय संबंधित अधिकारी वर्गाची चर्चा केल्यानंतर समोर आला तो या संस्थांना शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून परवानगी देणे. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत व स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळगाव बसवंत या दोन्ही संस्थांनी प्रस्ताव विहित मार्गाने शासनाकडे दाखल केले होते.

दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२० रोजी पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात उपस्थित राहून कारखाने कसे सुरू करता येतील. यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व संबंधित विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा करून तातडीने बैठक आयोजित करणेकरिता विनंती वजा मागणी केली असता. आज हे दोन्ही साखर कारखाने सुरू होणेकरिता बैठक संपन्न झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबविणे, त्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून निफाड तालुक्यातील हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरू करणे अत्यंत गरजेचे असून निफाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या दोन्ही संस्था पुढे आलेल्या आहेत. कारखाने शेतकऱ्यांचे असून बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे हे जनहित डोळ्यासमोर ठेवून या बाजार समितीने दाखल केलेल्या प्रस्तावास शासन स्तरावरून तातडीने परवानगी देण्यात येईल. तसेच स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था ही आर्थिक दृष्ट्या सक्षम पतसंस्था असून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. हि संस्था दोन कोल्ड स्टोरेज व्यावसायिक रित्या यशस्वीपणे चालवित आहे. या संस्थेस कारखाना चालविण्यास दिल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव मिळेलच, त्याचबरोबर कामगारांच्या हाताला काम मिळून कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत चालू होतील व रोजगारही उपलब्ध होईल. हा व्यापक दृष्टिकोन तसेच शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावास कागदपत्रांची पूर्तता करून विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे अशी सूचना माननीय नामदार अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकारी वर्गात केली असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.

यावेळी राज्याचे पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजकुमार देवरा, पणन संचालक सतीश सोनी, सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, साखर विभागाचे उपसचिव संतोष घाडगे, पणन विभागाचे उपसचिव वळवी, सहकार विभागाचे उपसचिव रमेश शिंगटे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button