Pandharpur

स्वेरी परिवाराकडून लाॅकडाऊनमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जपणूक

स्वेरी परिवाराकडून लाॅकडाऊनमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जपणूक

रफिक आतार

पंढरपूर: महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग व तंत्रशिक्षण विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ हे अभियान सध्या सुरू आहे. या अभियानांतर्गत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी पदवी व पदविका तसेच फार्मसी पदवी व पदविका ही चारही महाविद्यालये उत्स्फूर्तपणे सहभागी होत लॉकडाऊनच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक झाड लावण्यात येत आहे.

स्वेरीचे संस्थापक सचिव तथा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे सर या अभियानाबाबत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम न करता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वेरी परिवार’ नेहमीच काम करत आलेला आहे आणि आज निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ‘एक कर्मचारी एक झाड’ ही संकल्पना राबवून स्वेरी परिवाराकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे.’ गतवर्षी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण महामंडळ (ए.आय.सी.टी.इ) कडून ‘एक विद्यार्थी एक झाड’ या संकल्पने अंतर्गत स्वेरी परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला होता. ‘एक कर्मचारी एक झाड’ या अभियानांतर्गत अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, डॉ. अभय उत्पात, कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button