Thane

आदिवासी बंधूंचा अपघात करणाऱ्या दोषींवर कार्यवाही करून निःपक्षपाती पणे न्याय मिळावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन

आदिवासी बंधूंचा अपघात करणाऱ्या दोषींवर कार्यवाही करून निःपक्षपाती पणे न्याय मिळावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन

कुळगाव जिल्हा ठाणे मिलिंद जाधव

मयत श्री.जगन रामा मेंगाळ,व श्री.दिनेश बुधाजी ठोंबरे या आमच्या होतकरू तरुण आदिवासी बंधूचा,अपघात करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होवून आमच्या आदिवासी मेंगळ परिवार व ठोंबरे परिवाराला निःपक्षपाती पणे न्याय मिळणे बाबत तक्रारी निवेदन.

आदिवासी बंधूंचा अपघात करणाऱ्या दोषींवर कार्यवाही करून निःपक्षपाती पणे न्याय मिळावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन

कुळगाव जि ठाणे येथिल रहिवासी मयत श्री.जगन रामा मेंगाळ,वय.३० वर्ष,श्री.दिनेश बुधाजी ठोंबरे,वय.२६ वर्ष हे,मु.लव्हाळी,पो.चरगाव,ता.अंबरनाथ,जि.ठाणे यांचा दिनांक – २९/०१/२०२० रोजी एम.एच.०४,जी.एफ.६६८५ आयशेर(टेम्पो)या बॉयलर कोंबड्या भरलेल्या भरधाव गाडीने दोन्ही बंधूंचा अपघात झाला . उपरोक्त नामोल्लेखीत आमच्या आदिवासी बांधवांचा एम.एच.०५,डी.डी.६६९० या होंडा शाईन दुचाकिधारक बांधवांचा सोनावळेगाव बस स्थानक जवळ,रात्री ठीक.९.१५ वा.च्या दरम्यान अपघात केला.आमच्या आदिवासी समाजातील जगन मेंगाळ हे बंधू जागीच ठार झाले.तर दिनेश ठोंबरे हे आदिवासी बांधव धनलक्ष्मी हॉस्पिटल बदलापूरगाव येथे आय.सी.यू.मध्ये उपचार घेत आहेत.सदर दोन्ही आदिवासी युवक हे घरातील कमावते पुरुष असल्यामुळे,सदर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तरी सदर गुन्ह्याबाबत निःपक्षपातीपणे तत्काळ तपास होवून आदिवासी परीवारांना न्याय मिळावा.
व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा विविध आदिवासीं संघटना सोबत घेवून व समस्त आदिवासी जनसमुदायासह प्रशासना विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कविता वसंत निरगुडे आदिवासी समाजसेविका यांनी पत्राद्वारे देण्यात आला आहे.

सादर पत्राच्या प्रती खलील विभागांना रवाना करण्यात आल्या आहेत

(१)मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे,
(२)मा.पोलीस अधीक्षक साहेब,पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण,
(३)मा.उपविभागीय अधिकारी साहेब,उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय उल्हासनगर,
(४)मा.तहसिलदार साहेब,तहसिलदार कार्यालय अंबरनाथ.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button