Maharashtra

पंढरीतील लाईफ लाईन हॉस्पीटल विरोधात मेडिकल कौन्सील कडे तक्रार दाखल-प्रशांत लोंढे

पंढरीतील लाईफ लाईन हॉस्पीटल विरोधात मेडिकल कौन्सील कडे तक्रार दाखल-प्रशांत लोंढे

जाहिरात मोफतची.. अन बिलासाठी गोरगरीबांना तगादा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरांमध्ये नामवंत असलेले लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाइफलाईन या हॉस्पिटलची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत या विषयाचा अर्ज क्रमांक MMC2020233614 नुसार भारतीय मेडिकल कौन्सिल ( व्यावसायिक आचार, शिष्टाचार आणि नीतिशास्त्र ) विनियम, 2002 अंतर्गत तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोंढे यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्याकडे दाखल केल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. श्री महादेव नामदेव सावंत रा. तुंगत तालुका पंढरपूर हे सालगडी म्हणून मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत त्यांची सून सौ. प्रीती रंजित सावंत हि आठ महिन्यांची गरोदर असताना तिचा २५/०६/२०२० रोजी अचानक रक्तदाब वाढल्यामुळे तिला पंढरपूर येथील सर्वोपचार रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले . तेथील डॉक्टरांनी पंढरपुरातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही .तुम्ही रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे घेऊन जा असा सल्ला दिला . परंतु सोलापुरातील कोरोणाच्या प्रादुर्भावाच्या बातम्यांनी भयभीत असलेले उपरोक्त रुग्णाच्या नातेवाईकांना समाजमाध्यमांद्वारे प्रसारित झालेल्या प्रसूती व सिझर एकदम मोफत अशा आशयाची लाइफलाईन हॉस्पिटलने दिलेली जाहिरात आठवली व त्यांनी आपल्या सुनेचा उपचार लाईफलाईन येथे करण्यासाठी दि.२५ /०६/२०२० रोजी तिला लाईफलाईन हॉस्पिटल येथे घेऊन आले .परंतु लाइफलाईन हॉस्पिटलनी अडवणूक करीत अशा मोफत उपचाराची मर्यादा संपलेली आहे तुम्हाला मोफत उपचार मिळणार नाहीत, तुम्हाला पैसे भरावे लागतील, आधी रु २५०००/ हजार अॅडव्हान्स भरा तरच उपचार करू असे सांगितल्याने रक्तदाब वाढलेल्या आपल्या सुनेची परिस्थिती पाहता लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी असहाय झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रु १००००/ ची जमवाजमव करून हॉस्पिटलला भरले व उपचार सुरू करण्यासंबंधी रुग्णालयाची गयावया केली तेव्हा उपचार सुरू होऊन रुग्णाची प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे होऊन मुलगी झाली आता रुग्णालय त्यांनी केलेल्या उपचाराची फी वसूल करण्यासाठी आणखी अॅडव्हान्स लवकरात लवकर भरा अन्यथा आम्ही रुग्णाला डिस्चार्ज करणार नाही . असे सांगत रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना तगादा लावत आहे , तरी महोदयांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून लाईफलाईन या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्याकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button