Mumbai

?Big Breaking… विकएंड लॉक डाऊन नियमावली जाहीर..!शनिवार रविवार..काय राहील बंद काय राहील सुरू..!

?Big Breaking… विकएंड लॉक डाऊन नियमावली जाहीर..!शनिवार रविवार..काय राहील बंद काय राहील सुरू..!
राज्यात कोरोना रोगाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आणि आरोग्य यंत्रणा देखील अपूर्ण पडत आहेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. आणि शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल्स, रेटॉरन्ट्स, बार बंद करण्यात आले असून त्यांना फक्त सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल देण्याची मुभा आहे. दरम्यान, शुक्रवारी ८ वाजेपासून ते सामोवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यात अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक कारण यांना सूट देण्यात आली आहे.

काय राहील सुरू..?

– अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. तर दूध डेअरी नियमांसह सुरु राहील.

– केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी

– माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विकेंड लॉकडाऊनमध्ये परवानगी.

– वीकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु असेल.

– मीडियाला परवानगी असेल

– ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील

– शेतीशी निगडीत सेवा सुरु राहतील

– रेस्टोरंट, हॉटेल यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी. 10 एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक

काय राहील बंद..?

– शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही. यात खाजगी वाहनांसह खाजगी बसेसचा देखील समावेश आहे. 10 एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक असेल. ही चाचणी १५ दिवसांसाठी ग्राह्य धरली जाईल. RTPCR चाचणी अहवाल नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.

– पार्सल सेवा बंद असून ग्राहकांना हॉटेलला जाऊन पार्सल घेता येणार नाही.(होम डिलिव्हरी मिळेल)

– सर्व धार्मिक स्थळं बंद, फक्त नित्य पूजा आणि प्रार्थनेला संबंधितांच्या उपस्थितीत परवानगी

यासह ज्या गोष्टी आठवड्याच्या पाच दिवस बंद करण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button