Bollywood: प्रभास- दिपीकाला ऍक्शन ट्रेनिंग देण्यासाठी हॉलिवूड मधून येणार ट्रेनर ..प्रोजेक्ट K ची धमाकेदार तयारी..!
सध्या अनेक बॉलिवूड-साऊथ सुपरस्टार एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसून येत आहेत. लवकरच बॉलिवूडची मस्तानी आणि साऊथचा बाहुबली अर्थातच दीपिका पादुकोण आणि प्रभास एकत्र झळकणार आहेत. प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर चित्रपट ‘प्रोजेक्ट K’ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. सायन्स फिक्शन जॉनरचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करु शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मितीत निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत.या चित्रपटाच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम केलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या अॅक्शन सीनसाठी हॉलिवूडमधून अॅक्शन दिग्दर्शकांना बोलावण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅक्शन या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. त्यामुळे अॅक्शन सीन अगदीउत्तम रित्या व्हावेत निर्मात्यांची इच्छा आहे. यामध्ये त्यांना कोणताही हलगर्जीपणा चालणार नाहीय. त्यामुळे चित्रपटाच्या प्रत्येक सीनवर जवळपास 5 अॅक्शन युनिट काम करत असल्याचंही सांगण्यात येत आहे.त्यामुळे हा चित्रपट एक मोठं सरप्राईज पॅकेज असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.






