India

?आरोग्याचा मूलमंत्र…फिट्स येणे (फेफरे येणे)..!लक्षणे आणि उपाय..

?आरोग्याचा मूलमंत्र…फिट्स येणे (फेफरे येणे)..!लक्षणे आणि उपाय…

वरवर निरोगी दिसणाऱ्या मुलांमध्ये अचानक झटका येणे, शरीराच्या वारंवार विचित्र हालचाली होण्यास फेफरे वा फिटस् येणे असे म्हणतात त्यास मज्जा किंवा चेतासंस्थेचा आजार असे म्हणतात. फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण राहते…

मज्जा किंवा चेतासंस्थेच्या आजारांतला झटका केवळ दहा ते तीस सेकंदांचा असतो. काही वेळा त्यानंतर मूल बेशुद्ध पडते किंवा डोळे फिरवते. या आजारात तीव्र झटका हा एकाचवेळी संपूर्ण शरीरात येतो. यात तोंड, हातपाय तसेच शरीरातील अन्य स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. मेंदूकडे पोहोचणाऱ्या संवेदना काही वेळासाठी यात खुंटतात, त्यामुळे यावेळी मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. काहीवेळा तापाचे प्रमाण वाढल्याने फेफरे येतात. हा काळ पंधरा मिनिटे ते अर्धा तास इतका असतो.

लक्षणे

पहिल्या टप्प्यांत चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, शरीर सैल पडणे अशी लक्षणे जाणवतात

-फेफरे किंवा फिट येण्याच्या टप्प्यांत काही तीव्र संवेदना कारण ठरू शकतात.
– मेंदूमधील कंपनांमध्ये किंवा कामात अडसर निर्माण होणे.
– खूप ताप, अचानक वाढलेला रक्तदाब वा मधुमेह
– अतिनैराश्य
– रक्तदाबाचे प्रमाण खाली जाणे.
– चक्कर येऊन आदळल्याने शरीर सैल पडणे.

रुग्णांची प्राथमिक काळजी

फिटस् येत असतील तरी सतत या आजाराच्या दडपणाखाली राहू नये. दुखापत होईल, असे काम हाती घेऊ नये, उदा. विस्तवाजवळ काम करणे, उंचावर चढणे, जोरात वाहन चालवणे.
डोळ्यावर तीव्र प्रकाशझोत येईल अशा ठिकाणी काम करणे टाळावे.

औषधोपचार सुरु असतील तर त्यात खंड पाडू नये.

प्राणायाम, योगा या सारख्या वेदनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या थेरपीज् महत्त्वाच्या असतात. त्यांचा वापर करावा.

हा त्रास असणाऱ्या रुग्णांमध्ये औषधांनी थोडी झोप येते. पण, त्यामुळे औषधे बंद करू नयेत.

फिटस् रोखण्याचे उपचार

फीट आली तर रुग्णाच्या तोंडाजवळ चप्पल सरकवली जाते. ही अतिशय चुकीची कल्पना आहे. दातामध्ये पट्टी, चमचा किंवा कपडा सरकवण्याचा प्रयत्न केला तर इजा होऊ शकते. रूग्णाला दाबून धरले तरी त्याला इजा होते.

रुग्णाला कुशीवर झोपवावे, त्याची लाळ गळू द्यावी. त्यानंतर, रुग्णाला धीर द्यावा. फीट आली असता नाकात उग्र वासाचे वेखंड फुंकावे पण ते नाकात जाणार नाही याची काळजी घ्यावी. ते नसल्यास मिठाच्या पाण्याचे एक-दोन थेंब त्यावेळी नाकपुडीत सोडावेत. लगेच करायचा उपाय म्हणून त्याचा उपयोग होतो. या रुग्णांना मानसिक आधार देणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button