चंद्रपूर

मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी……..

मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी……..

ज्ञानेश्वर जुमनाके

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३०० नागरिकांना पाण्याची कॅन व पाणी एटीएम कार्ड व मिठाई देऊन छोटूभाई यांच्या कार्यालयात मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली वरोरा येथील प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणारे शहीद वीर बाबुराव शेडमाके वार्ड व अभ्यंकर वार्ड येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरीता सामाजिक संस्था व नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय च्या मागे वाॕटर एटीएम तयार करण्‍यात आले असून त्या परिसरातील गोरगरीब गरजू नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरीता प्रभागाचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती जैरुद्दिन छोटू भाई यांनी दिवाळी व ईद साजरी न करता त्यातून वाचलेल्या पैशातून त्यांच्या आई श्रीमती सहिदाबानु यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 300 वाॕटर कॕन व वाॕटर एटीएम कार्ड (१० दिवस पाणी मोफत) देण्याचे ठरवून आज संपूर्ण विश्वाला शांती अमन आणि भाईचारा चा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त सदर कार्यक्रम आयोजित करून त्यांची जयंती अतिशय उत्साहात व आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली. छोटूभाई यांच्या आई सहित मान्यवरांच्या हस्ते ३०० नागरिकांना कॅन व कार्ड वाटप केले.

यावेळी लक्ष्मण रावजी गमे उपसेवा अधिकारी गुरुकुल आश्रम मोझरी, सुनील भाऊ वरखडे, शेख सर, अशोक पाठक सर, प्राध्यापक प्रवीण खिरटकर, प्रदीप कोहपरे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ता नगरसेवक डॉक्टर दुर्गे, ममता मरस्कोल्हे सामाजिक कार्यकर्ता, डॉक्टर ढवस, डॉक्टर टोंगे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष प्राध्यापक कावडे,गोपाल गुडधे सर,ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेव बोर्डे, मगरे जी, ठावरी गुरुजी, विक्रम नागरकर, नथ्थुजी सोनटक्के,शेषराव भोयर, सचिन ढवस,गोलू पाठक, कैसर शहा, शामराव खंडाळकर, बाबा खंडाळकर, मिथुन पाठक, विलास पेंदे, सुरज नागरकर, राकेश कोडापे, रवी माटे, ठावरे जी, विजय कोहळे,सहित अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित उपस्थित राहून सर्व नागरिकांना कॕन व कार्ड वाटप केले या कार्यक्रमाचे संचालन मामा गुडधे यांनी केले, आभार प्रदर्शन करताना छोटू भाई म्हणाले शहरात 45 टक्के नागरिक बोरवेल चे दूषित पाणी वापर करीत असून अशा सर्व नागरिकांना नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत पर्यंत शहरात अनेक ठिकाणी वाटर एटीएम चे निर्मिती करून शुद्ध पाणी मिळवून देणार असे मत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ता पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने हा मोहम्मद पैगंबर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम हा पाणीपुरवठा सभापती व ऑल इंडिया कुमी तांझीम जिल्हा संघटनेच्या.वतीने घेण्यात आला होता…………. सर्व उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांते आभार जैरुद्दीन शेख छोटूभाई
संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती न. प. वरोरा यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button