Pandharpur

स्मार्ट व्हिलेज योजनेला स्व.आर.आर.पाटील यांचे नाव देण्यात यावे…संदिपराजे मुटकुळे

स्मार्ट व्हिलेज योजनेला स्व.आर.आर.पाटील यांचे नाव देण्यात यावे…संदिपराजे मुटकुळे

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने स्मार्ट व्हिलेज योजनेला स्व.आर.आर.पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केली

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर स्वच्छता अभियानासाठीच्या स्मार्ट व्हिलेज या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यांचे नाव देण्यात यावे.
आर.आर.पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छातेचा संदेश दिला आहे. संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान राबवून महाराष्ट्र स्वच्छ करण्याचे काम केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या स्वच्छाता अभियानातून आज राज्यात स्मार्ट व्हिलेज नावाने योजना सुरू आहे.त्या स्मार्ट व्हिलेज योजनेला दिवंगत आर.आर.पाटील यांचे नाव यावे.

याबरोबरच ज्या आर.आर.आंबानी स्वच्छाता योजना सुरू केली त्याला त्यांचेच नाव देणे उचित ठरेल.त्याच बरोबर या योजनेतून देण्यात येणार बक्षीस समारंभ सोहळा आर.
आर.पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त संपूर्ण राज्यभर पार पाडवा. असा प्रस्तावमंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा.असे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button