Maharashtra

तपसे चिंचोली परिसर पावसाने पिके जोमदार

तपसे चिंचोली परिसर : पावसाने पिके जोमदार

आंतरमशागतीच्या कामांना आली गती

प्रतिनिधी प्रशांत नेटके

मृगाच्या नक्षत्रा तील पाऊस चांगला झाल्याने औसा तालुक्यातील तपसे चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. दमदार पावसामुळे पिके जोमदार वाढली आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी उगवण झाल्या मुळे दुबार पेरणी केली होती. . नंतरच्या काळात चांगल्या पावसामुळे पिके जोमदार वाढली आहेत. सद्या शेतकरी पिकाच्या अंतर्गत मशागतीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

तपसे चिंचोली परिसरात मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या उरकून घेतल्या.मधल्या काळात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी कोळपणी , दुंढे, पाळी, खते देणे आदी कामे उरकून घेतली.
सुरुवाती पासूनच चांगला पाऊस असल्याने तपसे चिंचोली परिसरातील ओढे, नाले,विहिरी पूर्णपणे भरली आहेत. दररोज दोन तीन वेळा हलकासा पाऊस पडत असल्याने पिके बहरू लागली आहेत.

दरम्यान या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन,उडीद, मुग,पिवळा,तुर, आदी पिकांची खुरपणी व दुंडे मारणे आदी कामे उरकून घेतली.
दमदार पावसामुळे या भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.चांगल्या पावसामुळे या परिसरातील नदी नाले ओढे विहिरी पूर्णपणे भरली आहेत शेतकरी पूर्णपणे समाधानी असल्याचे दिसून येत आहे.

*[ औसा तालुक्यातील तपसे चिंचोली शिवारात शेतातील सोयाबीन चांगले आहे. पिकांतील आंतर मशागत करताना शेतकरी कुटुंब]*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button