Rawer

एक तास राष्ट्रवादीसाठी- निंभोरा स्टेशनला दादर-अमृतसर एक्सप्रेस थांब्यासाठी प्रसंगी लाक्षणिक उपोषण-सुनिल कोंडे.

एक तास राष्ट्रवादीसाठी-
निंभोरा स्टेशनला दादर-अमृतसर एक्सप्रेस थांब्यासाठी प्रसंगी लाक्षणिक उपोषण-सुनिल कोंडे.

महाराष्ट्र रत्न पुरस्काराबद्दल पत्रकार कृष्णा पाटील यांचा सत्कार.

निंभोरा-संदिप कोळी
येथील कृषी तंत्र विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे “एक तास राष्ट्रवादीसाठी” या कार्यक्रमाच्या आयोजनात राष्ट्रवादीतर्फे गावातील विविध अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्रभैय्या पाटील यांच्या आदेशाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठकीचे आयोजन केले जाते.या बैठकीत गावातीलव विविध शासकीय,सार्वजनिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
*दादर-अमृतसर एक्सप्रेसला निंभोरा येथील थांब्याकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण*-
निंभोरा येथे कोरोना काळापासून रेल्वे स्थानकावर दादर-अमृतसर हा एक्सप्रेस थांबत नसल्याने याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या यावेळी निंभोरा येथील रेल्वे स्थानकावर दादर-अमृतसर या एक्सप्रेस च्या थांब्यासाठी प्रसंगी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी सांगितले.काही शेतकऱ्यांनी,ग्रामस्थांनी गावातील सांडपाणी,शेतरस्ते आदींच्या अडचणींबाबत एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमांतर्गत अडचणी सांगितल्यावर त्यावर चर्चा करण्यात आली.
*पत्रकार तथा संपादक कृष्णा पाटील यांचा सत्कार*-
साप्ताहिक कृषिसेवकचे सं पादक तथा रावेरचे ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना सेलेब्स अँड गॉसिप्स ,मुंबई या संस्थेतर्फे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी पं स सदस्य प्रमोद कोंडे, ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे,यांसह ग्रा पं सदस्य मनोहर तायडे,दिलशाद शेख,कृष्णा पाटील,महेंद्र महाले व कार्यक्रमाचे अध्यक्ष डिगंबर चौधरी यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमास राष्ट्रवादी शहराध्यक्ष अतुल पाटील,युवक शहराध्यक्ष नवाज पिंजारी, मधुकर बिऱ्हाड़े,संदीप महाले,स्वानंद कृषी चे सचिव गुणवंत भंगाळे, रविंद्र भोगे,राष्ट्रवादी महिला सरचिटणीस कमल पंत,आशा सोनवणे,ओबीसी सेलचे प्रसिद्धिप्रमुख हर्षल ठाकरे,राज खाटिक,राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उमक,सागर चौधरी,रतन वाघ,किरण कोंडे,गौरव कोंडे,मनीष महाजन,जितेंद्र भावसार,धनराज बावस्कर, मनोज भंगाळे,गिरीश खाचणे,मनीष महाजन,विवेक पाटील आदी उपस्थित होते.यावेळी स्थानिकांनी गावातील अडीअडचणींवर चर्चा केली.सूत्र संचालन हर्षल ठाकरे तर आभार राज खाटीक यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button