Maharashtra

२५%घरपट्टी वाढीच्या विरोधात नगरपालिकेवर मोर्चा

२५%घरपट्टी वाढीच्या विरोधात नगरपालिकेवर मोर्चा

२५%घरपट्टी वाढीच्या विरोधात नगरपालिकेवर मोर्चा

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा नगरपरिषदेने यंदा घरपट्टीत तब्बल २५℅ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कचरा व्यवस्थापन आणि नियोजित पाण्याच्या नवीन पाईप लाईन वरुन कनेक्शन चा खर्च देखील आम जनतेवर टाकला जाणार आहे.

२५%घरपट्टी वाढीच्या विरोधात नगरपालिकेवर मोर्चा
पाणी पुरवठा, रस्ते, रहदारी, आरोग्य, स्वच्छता इत्यादी कोणत्याही स्वरुपाच्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या न.प.ने भोंगळ आणि गलथान कारभाराचा अलिकडे कळस गाठला आहे. सामान्य माणसाच्या तक्रारींची साधी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. शासन व प्रशासन कार्यरत असल्याचे कुठेही जाणवत नाही.एकार्ध्या चालक मालक संघटने प्रमाणे काम सुरू असल्याचे जाणवत आहे .
चोपडा नगरपालिकेने नागरीकांना विश्वासात न घेता  नागरी सुविधा न पुरविता आकरलेल्या  घरपट्टी वाढीचा निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे चोपडा शहरातील नागरीकांवर लादलेला आर्थिक  भुर्दंड आहे या वाढीव  घरपट्टीला विरोध दर्शविण्यासाठी डॉ.चंद्रकांत बारेला यांचा नेतृत्वाखाली ग्रामिण पोलिस स्टेशन जवळील पोलिस मैदाना पासून मोर्चाला प्रारंभ होऊन थाळनेर दरवाजा चिंच चौक गुजराथी गल्ली गोलमंदीर मेनरोडाने शनिमंदिर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी चौकाने नगरपालिका कार्यालयात मोर्चा आला.या मोर्चा मध्ये नगरपालिका प्रशासना विरोधात घोषणा देण्यात आले.
नगरपालिका कार्यालयात मोर्चा आल्या नंतर याठिकाणी मुख्याधिकारी अविनाश गांगोर्डे यांना निवेदन देण्यात आले.परंतु मुख्याधिकारी गांगोर्डे यांनी आपली भुमिका मांडतांना सांगितली की शासनाच्या नियमानुसार घरपट्टी ही आकारणी केली आहे.दर चार वर्षांनी कर सुधारणा करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगीतले.परंतु मोर्चा करांचा प्रश्नांचे समाधान कारक उत्तर न मिळाल्यामुळे मोर्च्यात सहभागी    डॉक्टर बारेला मित्र परिवाराचा कार्यकत्यांनी  प्रशासकीय ईमारतीच्या पाय-यावर बसून ठीया मांडुन समाधान कारक उत्तराची अपेक्षा करीत होते.परंतू चार वाजे पर्यंत समाधान कारक उत्तर मिळाल्याने अखेर मोर्चा कऱ्यानी वरिष्ट स्तरावर कायदेशीर पाटपुरावा करणार असल्याने डॉ.चद्रकांत बारेला यांनी सांगितले व ठीया आंदोलनांची सांगता करण्यात आले.
निवेदनावर डॉ, चंद्रकांत बारेला, प्रा, शरद पाटील, अर्जुन चोधरी, निलेश जाधव,दिपक वानखेडे, ईश्वर सूर्यवंशी, मंगल बडगुजर, अमोल राजपूत, गजानन पाटील, जियोद्दीन काजी,शकील मन्यार, फिरोज मन्यार, विवेक गुजर ,यांच्या सह्या आहेत,यावेळी नगराध्यक्षा सौ,मनीषा चॊधरी,गटनेते जीवन चॊधरी,यांच्या सह शहर विकास आघाडी चे काही नगरसेवक व पालिकेतील सर्व कर्मचारी हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button