अमळनेर शहरात दूषित पाणी पुरवठा..अमळनेर नगरपरिषद खेळतेय जनतेच्या जीवाशी?
अमळनेर येथे सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.नागरिकांचे आरोग्य आधीच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आहे.त्यात अमळनेर नगरपरिषदेकडून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठीक ठिकाणी अमळनेर नगरपरिषदेकडून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी दूषित आणि गढूळ असून लोकांना पिण्या योग्य नसल्याचे बोलले जात आहे. जल शुद्धीकरण केंद्रावर असलेले अमळनेर नगरपरिषदेचे कर्मचारी फक्त शो पुरता आहेत.कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
काल पैलाड,ताडेपुरा इ भागात दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा करण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. डोळ्यावर पट्टी बांधून काम करणारी नगरपरिषद धृतराष्ट्रची भूमिका निभावत आहे.लोकांमध्ये तीव्र असंतोष असून पाणी पुरवठा स्वच्छ निर्जंतुक आणि नियमित करण्याची मागणी होत आहे.






