लातूरच्या आडत बाजारातील ‘पोटली’ बंद करण्याचे ‘पणन संचालक व जिल्हा उपनिबंधक’ यांचे बाजार समितीला आदेश
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा परिणाम*
लातूर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
लातुर-गेल्या अनेक वर्षांपासून पोटलीच्या नावाखाली शेतीमालाचा लिलाव न करता ४०० ते ५०० रु. कमी भावाने खरेदी करून व कडता व शॅम्पलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट केली जात होती.या संदर्भात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन,आंदोलने करुन या पोटली पद्धतीला व कडता आणी शॅम्पल घेण्याच्या पद्धतीला विरोध केला होता.मात्र बाजार समिती प्रशासन या बाबतीत सकारात्मक नसल्याने शेवटी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट व पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सिमाताई नरोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पणन संचालक, पुणे यांना या सर्व बेकायदेशीर प्रकारातुन दररोज शेतकऱ्यांची करोडो रुपयांची लुट कशाप्रकारे केली जाते याबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांची लुट थांबवा अन्यथा पणन संचालक कार्यालयाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर पणन संचालक व जिल्हा उपनिबंधक,लातुर यांनी सकारात्मक विचार करुन बाजार समितीला ताबडतोब पोटली बंद करण्याचे व कडता आणी शॅम्पल न घेण्याचे आदेश दिल्यानंतर दि.२० फेब्रुवारी २०२० रोजी परिपत्रक काढून सर्व आडते, खरेदीदार यांना पोटलीत व्यवहार करु नये व कडता, शॅम्पल घेऊ नये अन्यथा दोषींवर कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ व नियम १९६७ नुसार कारवाई करण्यात येईल अशी सुचेना केली आहे.
या निर्णयाचे शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे, मात्र या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी.व शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा खरेदी- विक्री व्यवहार हा कायद्याप्रमाणे करावा व कडता शॅम्पल घेऊ नये,अन्यथा शेतकरी संघटना यानंतर अधीक तिव्र आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी,कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जेष्ठ नेते हरिश्चंद्र सलगरे, बाबाराव पाटील, अशोक भोसले, वसंत कंदगुळे,करण भोसले,केशव धनाडे, शिवाजी बिराजदार, गोविंद भंडे, बाळासाहेब जाधव,दत्तु कंदगुळे,आण्णाराव चव्हाण, इब्राहिम शेख,आदिंनी दिला आहे.







