कर्तव्य बजावत असतांना निफाड चा सुदर्शन शहीद…… …
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कर
प्रतिनिधी : सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : नाशिक जील्यातील पिपळगाव बसवंत जवळील आणि
निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (३२) या जवानाचा पंजाबयेथील पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना श हीद झाला. या घटनेमुळे निफाड तालुक्यात शोककळा पसरली असून, सुदर्शन यांचे पार्थिव बुधवारी (दि. ११) आहेरगावी येण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख यांची पठाणकोट येथे पोस्टींगला होते सोमवारी (दि. ९) मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांना वीरमरण आल्याची बातमी कुटुंबाला येऊन धडकली. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर अंत्यसंस्कारासाठीचे नियोजन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. प्रशासक स्वप्नाली कागदे, ग्रामसेवक भालचंद्र तारवारे यांनी सुदर्शन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली त्यांच्या अंतविधीची तयारी केली.
सुदर्शन याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पहिली ते सातवीचे शिक्षण आहेरगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर येथे, आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव हायस्कूल, तर अकरावी ते बारावीचे शिक्षण पिंपळगावच्या क. का. वाघ महाविद्यालयात झाले आहे. २००९ – १० साली सैन्यदलात कुलाबा येथे सुदर्शनची सैन्यदलात भरती झाली. त्यानंतर पुणे येथे प्रशिक्षण झाले. २०१२ साली लेह-लडाख येथे पहिल्यांदा पोस्टींग झाली. २०१५ साली अमृतसर येथे पोस्टींग. २०१८ पासून पठाणकोट येथे कर्तव्यावर सुदर्शन कर्तव्यावर होते. कुटूंबात आई, वडील, एक मोठा भाऊ आहे. घरी एक एकर शेती असून, त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. सैन्यदलात असल्याने सुदर्शन कुटुंबाला हातभार लावत होता. मोठा भाऊ समाधान विंचूर येथील एक्सपोर्ट कंपनीत लाईनमन आहे. ६८ वर्षीय त्यांचे वडील दत्तात्रय देशमुख शेती बघतात. तर ५० वर्षीय आई कल्पना ह्या पतीला शेती कामात मदत करतात.
लहानपणापासूनच सैन्यदलात जाण्याचे सुदर्शनचे स्वप्न होते. उरी बाळगलेल्या ध्येयाची स्वप्नपूर्ती झाली. त्याचा गावालाही अभिमान होता. चुलत भाऊ योगेश दीपकराव देशमुख (२५) यानेही सुदर्शनचा आदर्श समोर ठेऊन सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगले. २०१४-१५ साली भरती झालेले योगेश आता कुपवाडा येथे कर्तव्य बजावत आहे.
तो फोन ठरला अखेरचा……
सुदर्शन याने सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आहेरगावी फोन करीत आपल्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारली. चांदवडला घरासाठी जागा घेण्याची इच्छा सुदर्शनने व्यक्त केली. ती जागा बघण्यासाठी वडिल दत्तात्रय मंगळवारी चांदवड जाणार होते. तर मोठ्या भावासाठी इलेक्ट्रॉनिक चे दुकान टाकून देणार असल्याचे सांगत आनंदात कुटुंबासोबत गप्पा मारल्या मात्र, दुर्दैवाने चार तासानंतर सोमवारी मध्यरात्री सुदर्शनच्या मृत्यची बातमी येताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. उरी बाळगलेले स्वप्न काही क्षणात मावळल






