अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात यावा..अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशन चे निवेदन….
संयुक्त राष्ट्र संघटनेने दि.18 डिसेंबर 1992 राष्ट्रीय,वांशिक,धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहिरनामा स्वीकृत करुन प्रस्तुत केला आहे. त्यानुसार अलपसंखयक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा,धर्म,परंपरा इत्यांदीचे संवर्धन करता यावे, तसेच या बाबतचे वैशिष्ट्यांची प्रभाविपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अलपसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात यावा.
अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकारी सो. नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना अलपसंखयक विकास व हक्क फाऊंडेशन चे अध्यक्ष आरीफ कमर शेख सोबत डाॅ.मतीन शेख,सगीर मंसूरी ,जावेद अहमद,रियाज सैय्यद इ उपस्थित होते.






