Chandwad

नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर नगरसेवकांची हरकत

नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर नगरसेवकांची हरकत

उदय वायकोळेचांदवड

Chanwad : चांदवड नगरपरिषद निवडणूक 2020 साठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.यात 2015 या वर्षी असलेल्या जुन्या प्रभागरचनेत बदल झाल्याचे दिसून आल्याने विद्यमान नगरसेवकांनी हरकत नोंदवली आहे.नवीन प्रभाग रचनेत व नकाशात तफावत दिसून येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.तरी सदर प्रभाग रचनेस विद्यमान 12 नगरसेवकांनी हरकत घेतलेली असून नगराध्यक्ष रेखा गवळी,उपनगराध्यक्ष देविदास शेलार,नगरसेवक अल्ताफ तांबोळी,नवनाथ आहेर,रवींद्र अहिरे,बाळू वाघ यासंह इतर नगरसेवकांच्या सह्या आहेत.
प्रभाग क्रमांक 9 चे विद्यमान नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी मुख्याधिकारी चांदवड नगरपरिषद यांचेकडे स्वतंत्रपणे एक मागणीपत्र सादर केले असून त्यात प्रभागाचे तयार करण्यात आलेले नकाशे,त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती व लोकसंख्येची माहिती याची मागणी आवश्यक ती फी भरून उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button