?सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शिवजयंती चा हा फोटो
पैशांची नाही तर पहा मनाची श्रीमंती
प्रा जयश्री दाभाडे
महाराष्ट्र
सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोण म्हणतं शिवजयंती साजरी करतांना खूप पैसा खर्च करावा लागतो. निधी गोळा कारवा लागतो मिरवणूक काढावी लागते.पहा लहानग्या विद्यार्थ्यांनी अशी साजरी केली शिवजयंती.माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज मनात असले पाहिजे मग प्रश्न नाही पडत की मी महाराजांना मानवंदना कशी देऊ.
शिवजयंती च्या नावा खाली निधी जमा करून ढोल ताशे लावून अवाजवी खर्च केला जातो. शिवरायांना डोक्यावर घेऊ नका डोक्यात घ्यायची वेळ आली आहे. हृदयात जर महाराज असतील तर कोणत्याही प्रकारे शिवजयंती साजरी करता येऊ शकते हेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटो मुळे सिद्ध होते.
लहानग्या मुलांना महाराज आणि महाराजांच्या कार्याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. लोखंड गरम असताना जर योग्य घाव घातले तर त्याच उत्कृष्ट कलाकृतीत रूपांतर होते.
म्हणूनच शिवजयंती च्या बदलेल्या दिशा आणि उद्देश सुधारण्याची वेळ अजून गेली नाही .
क्रमशः






