Nashik

सातपूर पोलीस ठाण्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा शुभारंभ.

सातपूर पोलीस ठाण्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा शुभारंभ.

नाशिका प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-सौंदर्य आणि पाणीदार शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात त्रंबकेश्वरपासून उगम पावलेली गोदावरी नदी ही मूळ प्रवाह सोडून रस्त्यावरून वाहतांना दिसते. त्यामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण होते, शिवाय पाण्याचाही अपव्यय होतो.

हे पावसाचे पाणी साठवून ठेवल्यास भूजल पातळी वाढू शकते, यादृष्टीने नमामी गोदा फाउंडेशनच्यावतीने सातपूर पोलीस ठाण्यात रेन हार्वेस्टिंगचा प्रयोग राबवण्यात आला आहे.

याचा शुभारंभ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव, धनश्री क्षीरसागर, निशांत वाघ, पोलीस उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौघुले, लक्ष्मीकांत पाटील,अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, तुषार क्रांतिकार उपस्थित होते.

पावसाच्या पाण्याचे संवर्धन करून ते मोठ्या प्रमाणावर साठवले पाहिजे, या मोदी संकल्पनेला नाशिक शहर पोलिसांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला असून त्याला नाशिकच्याच नमामी गोदा फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.

तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून होण्याची शक्यता नाकारता येत नसून भविष्यात पाण्याचे महत्व कळणार आहे. पावसाचे पाणी निसर्गाची देणगी असून एक प्रकारे ही वॉटर बँक तयार करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. भारतात हा प्रयोग सर्वत्र राबवला तर नक्कीच पाणी बचत होणार असल्याचे मत सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी व्यक्त केले आहे.

पर्यावरणाशी असलेलं मनुष्याचे नाते जपायचं असेल तर असे प्रयोग यशस्वी केले पाहिजे, ज्या ठिकाणी जास्त पाऊस तिथेच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, ही चिंताजनक बाब असून पाणी बचत करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सातपूर पोलीस ठाण्यात रेन हार्वेस्टिंग सारखा प्रयोग शहरात ६५ ठिकाणी करणार असल्याचे मत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button