Amalner

पाडसे येथे तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू…

?️अमळनेर कट्टा..पाडसे येथे तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू…

अमळनेर येथील पाडसे या गावात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.फिर्यादी अजय गव्हाणे याने दिलेल्या माहितीनुसार मयत प्रदीप विकास गव्हाणे (वय 20) याने स्वतःच्या बोटवरून पाणी भरण्याकरिता मोटर चालू केली असता त्याला शॉक लागला. तो हातपाय झटकू लागल्यानेशेतात जाणाया इसमाने मोटर बंद करायला सांगितल्याने त्याच्या वहिनीने मोटर बंद केली.

मात्र प्रदीप याची काहीच हालचाल होत नसल्याने त्यास अमळनेर येथे खाजगी
दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मारवड पोलिसात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपिआय टाहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना. सचिन निकम व भास्कर चव्हाण करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button