Nashik

दिंडोरीसह तालुक्यात एक गाव एक गणपती संकल्पना अमल बजावणी करून आदर्श निर्माण करावा..अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर

दिंडोरीसह तालुक्यात एक गाव एक गणपती संकल्पना अमल बजावणी करून आदर्श निर्माण करावा. शर्मिष्ठा वालावलकर

सुनिल घुमरे नाशिक प्रतिनिधी

सद्या जगभर कोरो ना पसरलेल्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, आपल्या व सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक गाव एक गणपती संकल्पना राबवून एक आदर्श निर्माण करा असे आव्हाहन नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले.

दिंडोरी ये थिल पंचायत समिती सभागृहात दिंडोरी पोलीस ठाणे अंतर्गत गणेश उत्सव मंडळ आणि शांतता समितीची बैठक प्रसंगी मार्गदर्शन केले या वेळी बोल ताना पुढे त्या म्हणाल्या की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी आपण सर्व गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी काटेकोरपणे पालन करावे व यावर्षीचा गणेशोत्सव सण साध्या पद्धतीने साजरा करू कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आणि होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे आव्हाहन केले .सर्व गणेशोत्सवाच्या गणेश मंडळांनी एकाच वेळेत नियमित आरती करून एक चांगला आदर्श आपण निर्माण करावा व विसर्जनवेळी कुठल्याही प्रकारचे मिरवणूक न काढता आपल्या घरीच विसर्जन करा ल ही आशा व्यक्त केली.

प्रसंगी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, तहसीलदार कैलास पवार ,नगराध्यक्ष कैलास मावळ, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश येवले ,दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनी केले व सर्व गणेश मंडळांना आवाहन केले की शासनाच्या नियमांचे पालन करून आपण गणेशाची स्थापना करावी.व दर वर्षी प्रथम द्वितीय पारितोषिक मिळाली ली जानोरीगावा सह इतर २३, गावांनी जो निर्णय घेतला आहे की घरातच गणेशाची स्थापना करू विसर्जन क रू हा आदर्श तालुक्यातील सर्वच गावांनी घ्यावा. तसेच तहसीलदार कैलास पवार यांनी शासनाची नियमावली सांगत एक गाव एक गणपती बसविण्याचे आव्हाहन केले. नगराध्यक्ष कैलास मावळ ,पत्रकार संघाचे अद्यक्ष संतोष कथार , नगरसेवक माधवराव साळुंखे फारुख बाबा यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, शांतता कमिटीचे मनोज ढिकले, , काका देशमुख पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील मुळाणे,भगवान गायकवाड, अशोक निकम, बाळासाहेब अस्वले, अशोक सांगळे ,वामन पाटील, रोशन परदेशी, निलेश बोडके, तौशिफ मणियार, गलीफ मिरजा, पो कॉन्स्टेबल लहारे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी आभार पोलीस उपनिरीक्षक डफळ मॅडम यांनी मानले.

दिंडोरी नगरपंचायत शहरात सर्व गणेश मंडळांची बैठक घेऊन संपूर्ण शहराचा एकच गणपती बसविण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष कैलास मवाळ व नगरसेवक माधवराव साळुंखे यांनी दिली या निर्णयाचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button