DharangawMaharashtra

धरणगाव तालुक्यात आज २२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

धरणगाव तालुक्यात आज २२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

रजनीकांत पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील २२ जणांचा कोरोनाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या २२ रुग्णांमध्ये धरणगाव शहरातील विविध भागातील २१ तर बोरखेडा येथील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे चिंतामणी मोरया परिसरातील १० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या वृत्ताला तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दुजोरा दिला आहे.

धरणगाव कोवीड केअर सेंटरने संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. आज सायंकाळी तपासणी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यात पॉझिटिव्ह आलेल्या २२ जणांमध्ये धरणगाव शहरातील २१ तर बोरखेडे येथील एकाचा समावेश आहे. धरणगाव शहरातील आढळून आलेले २१ रूग्ण हे घोडे गल्ली, संजय नगर, मराठे गल्ली, वाणी गल्ली, खत्री गल्ली परिसरातील आहेत. दरम्यान रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे चिंतामणी मोरया परिसरातील १० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यात बाधितांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरीकांची स्वत:ची काळजी घेत घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button