अमळनेर: मासेमारी करायला गेला आणि जीव गमावला..!
अमळनेर येथील मुडी प्र. डांगरी गावातील मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यासंदर्भात मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की एकनाथ देवचंद भील हे मासेमारी करण्यासाठी पांझरा नदीत गेले असतांना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.समाधान भील हे दि.16 डिसेंबर रोजी आपल्या घरी होते.त्यावेळी गावातील काही लोक नदीकडे जात असल्याचे पाहिले त्यामुळे तेही नदी कडे गेले तेथे एका इसमाचे प्रेत हे तरंगत होते. ते प्रेत समाधानचे वडील एकनाथ देवचंद भील यांचेच असल्याचे त्याच्या लक्षात आले.
सदर मयत व्यक्ती मासेमारी करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मासेमारी करताना पांझरा नदीत बुडून मृत्यू झाला असावा.सदर प्रेत शव विच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.याबाबत समाधान भिल याने दिलेल्या फिर्यादी नुसार मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली असून पुढील तपास पो कॉ. भटूसिंग तोमर करत आहे.






