Chandwad

देवदिवाळीच्या दिवशी बैलफाशी खिंड चढून चांदवडच्या दुर्गभ्रमंती सदस्यांनी केला मेसणा किल्ला सर

देवदिवाळीच्या दिवशी बैलफाशी खिंड चढून चांदवडच्या दुर्गभ्रमंती सदस्यांनी केला मेसणा किल्ला सर

उदय वायकोळे चांदवड

चांदवड मनमाड रोडवरील मेसनखेडे गावाजवळील मेसणा किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेतील दुर्लक्षित किल्ला आहे.निर्मनुष्य असलेला परिसर असून या किल्ल्याचा उपयोग टेहळणी साठी केला जात होता असे सांगितले जाते. दिसण्यास सोपा मात्र चढाईस अवघड अशी चढण आज चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाच्या सदस्यांनी सर केली. विशेष म्हणजे यात छायाचित्रात दिसत असलेला लहान बालक रामा शिंदे हा सुद्धा अगदी जोमाने किल्लावर चढत होता.
आज देवदिवाळी चे औचित्य साधून एक किल्ला निवडून निसर्गकिल्ले जपणुकीचा संदेश देण्याचा निर्धार सदस्यांनी केलेला होता.या किल्ल्यावर असलेल्या खिंडीत पूर्वी एक बैलाला गळ्याला दोर अटकून फाशी बसली असल्याचे स्थानिक सांगतात तेथेच ही बैलफाशी खिंड आहे.किल्ल्यावर पाण्याचे सहा टाके असून अजूनही पाण्याने फूल भरलेले दिसतात.दुर्लक्षित व निर्मनुष्य किल्ला असल्याने वाट समजत नाही तरी खडतर वाट शोधत किल्ला सर केल्याने सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button