Amalner

Amalner: 10 Exam:  PTA तर्फे परीक्षेला जाता जाता कार्यशाळेचे रविवारी आयोजन…विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन…

Amalner: 10 Exam: PTA तर्फे परीक्षेला जाता जाता कार्यशाळेचे रविवारी आयोजन…विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन…

रविवार,दि.5 फेब्रुवारी रोजी – 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी अमळनेरात
परीक्षेला जाता जाता…मोफत कार्यक्रम. खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे(PTA)
आयोजन.

अमळनेर-प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन(PTA) खाजगी कोचिंग क्लासेस संघटना,अमळनेर तर्फे इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास-परीक्षेला जाता जाता…कार्यक्रमाचे आयोजन रविवार,दि.5 फेब्रुवारी रोजी-शहरातील जुना टाऊन हॉल येथे करण्यात आले आहे.
सकाळी 9 वा.हा कार्यक्रम होणार असून,सदर विशेष सत्रास उपस्थित राहून इ. 10 वी मार्च 2023 चा बोर्ड परीक्षेचा करंडक जिंका,असा दावा आयोजकांनी केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घघाटक म्हणून कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते-

1)प्रमिला गिरी माई,पुणे(स्व जागरूकता),
2)श्री.सुहास पाठक सर,धुळे(विषय-विज्ञान),
3)श्री.डी.ए.धनगर सर,अमळनेर(विषय-गणित),
4)श्री.गौरव महाले सर,चोपडा(विषय-परीक्षेला जाता जाता)

व्याख्यानात-बोर्डाची उत्तरपत्रिका कशी
लिहावी?,परीक्षेतील तीन तासांचे व्यवस्थापन,
परीक्षा हॉलमधील आत्मविश्वास, परीक्षा काळातील घरातील वातावरण, पेपर लिहिण्याचे तंत्र,परीक्षा काळातील उजळणी,परीक्षेची भिती घालवणे,
मेरीट लिस्टमध्ये येण्यासाठीच्या टिप्स,
विषयानुरूप लिहिण्याची पद्धत,पेपर प्रेझेंटेशन,
विधायक विचार इत्यादी.

विद्यार्थ्यांनी सोबत वही
व पेन आणावेत.विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र खाजगी कोचिंग क्लास संघटनेचे(PTA) राज्य समन्वयक व मा.कार्याध्यक्ष-भैय्यासाहेब मगर सर व सर्व सदस्य खाजगी कोचिंग क्लासेस
संघटना(PTA)अमळनेर,यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button