11 वर्षीय मुलाचे परमोरी येथून अपहरण
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथील 11 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली असून त्याचे अपहरण झाल्याचे माहिती सदर मुलास परमोरी परिसरातून अज्ञात व्यक्तीने काहीतरी फुस लावून दुचाकीवरून पळवून नेल्याची बाब समोर आली असून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परमोरी येथील विशाल श्रावण गुंबाडे या अकरा वर्षाच्या मुलगा 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास लखमापूर फाटा येथून परमोरी गावाकडे एक मित्रासोबत येत असताना हेल्मेट घातलेल्या काळया दुचाकीवरून आलेल्या आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यास काहीतरी फुस लावत त्यास दुचाकीवर बसवून घेवून गेला आईवडिलांनी संध्याकाळी तो घरी न आल्याने त्याची चौकशी करत शोधाशोध केली नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही अखेर वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहे.






