Amalner

Amalner: अमळनेर तालुक्यातील तांदळीचा तरुण गुलाबराव दिलीप पाटील महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम

Amalner: अमळनेर तालुक्यातील तांदळीचा तरुण गुलाबराव दिलीप पाटील

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम

अमळनेर – तालुक्यातील तांदळी या लहानशा अविकसित खेड्यातील भूमीपूत्र गुलाबराव दिलीप पाटील हा जिद्द, चिकाटी, ध्येय डोळ्यासमोर ठेऊन करसहाय्यक (टॅक्स असिस्टंट) या पदासाठी एम.पी.एस.सी. परिक्षेत ओ.बी.सी. या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने व जनरल प्रवर्गातून राज्यातून 32व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याच्या निवडीचे तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन कौतुक होत आहे.

गुलाबरावने सन 2019 मध्ये रेल्वेची परिक्षा पास होऊन प्रारंभी मुंबई व सध्या शिंदखेडा रेल्वेमध्ये ग्रृप डी पदावर नोकरीत आहे. नोकरी करीत असतांनाच त्याने एम.पी.एस.सी. परिक्षेची खूण गाठ मनाशी बांधली आणि सन 2021 मध्ये कर सहाय्यक पदाची पूर्व परिक्षा देऊन पास झाला व मुख्य परिक्षा दिली असता सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 12 जुलै रोजी जाहिर झालेल्या निकालात त्याने हे दैदिप्यमान यश मिळविले. गुलाबराव हा सेवानिवृत्त गटसचिव व तांदळी वि.का. सोसायटीचे विद्यमान चेअरमन दिलीप साहेबराव पाटील आप्पा यांचे सुपुत्र असून माजी पोलीस पाटील मधुकर साहेबराव पाटील, प्रगतीशील शेतकरी अशोक पाटील, सुधाकर पाटील यांचे पुतणे व तांदळी गावाचे माजी पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, जुन्या काळातील प्रगतीशील शेतकरी साथी कै. साहेबराव तात्या पाटील यांचे नातू आहेत. गुलाबराव पाटील याच्या घवघवीत यशाचे तांदळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून तांदळी, निम, शहापूर, कळमसरे, पढावद, एकतास, एकलहरे, भिलाली पंचक्रोशीसह अमळनेर तालुक्यातून सामाजिक, राजकीय, शिक्षण, सहकार, क्षेत्रातून गुलाबरावाच्या यशाबद्दल कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तालुक्यातील अन्य तरुणांनीही गुलाबरावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन यश मिळवावे अशी तालुक्यातून अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button