Amalner

Amalner: बोरी नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

बोरी नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

आज दिनांक 06/08/2022 रोजी बोरी मध्यम प्रकल्पात रात्री उशिरा पर्यंत येणाऱ्या पाण्याची आवक पाहता ८० टक्के जिवंत साठा होण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज पाहता धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा येवा बघता धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज रात्री बोरी धरणातून जास्तीचे पुराचे पाणी सांडव्याद्वारे खाली बोरी नदीत सोडण्याची शक्यता आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला 451 क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरना पाटबंधारे विभाग, जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button